…म्हणून अनिल देशमुखांना जामीन देऊ नका- केतकी चितळे

मुंबई | राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जून रोजी एक दिवसाच्या जामिनावर मुक्तता करण्याची मागणी अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे केली आहे.

कायमस्वरूपी आमदार असल्याने अर्जदार हा राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेजचा सदस्य आहे, असं अनिल देशमुख यांनी न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटलं आहे. मात्र या जामिनाला अभिनेत्री केतकी चितळेनं (ketaki chitale) विरोध केला आहे.

अनिल देशमुख यांना जामीन देऊ नये. जर देशमुखांना जामिन दिल्यास ते फरार होतील. फरार झाले की ते पुन्हा मिळून येणार नाहीत, असा दावा केतकीने केला आहे.

केतकी चितळेवर राजकीय दबावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो राजकीय नेता कोण?, याची चौकशी सीबीआयने करावी अशी याचिका केतकी चितळेच्या वकीलांमार्फत केली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात धाव घेतली. अनिल देशमुख यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी! 

“तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे…” 

“…अशा लोकांना मी राजकीय विकृत औलादी म्हणेल”

पुरूषांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; ‘या’ सवयी करतील मोठं नुकसान 

“शरद पवारांचं वय झालंय, त्यांनी आता घरी बसावं”