…..म्हणून मला माझा गोरा रंग आवडत नाही, कंगना रणौत पुन्हा चर्चेत

मुंबई| बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. ती नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्य, बेधडक बोलणं, यामुळे चर्चेचा विषय बनत असते. यातच कंगना आता एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे.

आता कंगनाची एक जूनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने गोऱ्या रंगावर वक्तव्य केलं आहे.

कंगनाने वर्णभेदावर वक्तव्य केलं असून फेअरनेस ब्रँडची जाहिरात करण्यावर तिने नकार दिला आहे. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मी स्वत:ची जागा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि हा मोठा संघर्ष होता. मला जे काम दिले मी तेच केले असते. तर मला नाही वाटतं मी इथ पर्यंत येऊ शकली असते. त्यांच्यासाठी सुंदर असणे म्हणजे गोरं असणे आहे.

मी खूप गोरी होते आणि मी आणखी 3 ते 4 वर्ष तिथे टिकले असते, जे की कोणतीही गोरी व्यक्ती करू शकते. त्यांना फक्त हेच पाहिजे. पण मला ते आवडतं नाही. माझा गोरा रंग माझ्या सगळ्यात कमी आवडणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे,” असे कंगना म्हणाली होती.

या पहिले 2013 मध्ये एका मुलाखतीत कंगनानं यावर वक्तव्य केलं होतं. तेव्हा कंगना म्हणाली होती की “लहान असल्यापासून मला गोऱ्यारंगाची संकल्पना समजली नाही. आपण लोकप्रिय असल्यामुळे आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. आणि जर मी फेअरनेस क्रीमच्या जाहिरती केल्या तर तरुणांसाठी हे एक चांगल उदाहरण नसेल.”

दरम्यान, कंगनाच्या कामाविषयी बोलायं झालं तर कंगना लवकरच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.

लायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेत्या असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

या चित्रपटामध्ये जयललिता यांनी जीवनात केलेला संघर्ष आणि त्यांनी मिळवलेलं यश चित्रीत करण्यात आलं आहे. हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कोरोना लढ्यात आता विराट-अनुष्काचा पुढाकार, व्हिडीओ शेअर करत…

कोरोनातून बरं झाल्यानंतर आजीने डॉक्टरांना मारली मिठी, पाहा…

कोरोनामुक्त झालेल्या तरूणाने अनोख्या पद्धतीने केला आनंद…

‘या’मुळे बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर होतोय सोशल…

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी करू…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy