मुंबई | राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायम आहे. या आंदोलनादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी कर्मचाऱ्यांना पाठींबा देत असल्याचं सांगितलं होतं. या दरम्यान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे प्रचंड गाजले होते.
संतोष बांगर हे नाव आक्रमक राजकारणासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. आपल्या आक्रमक शैलीनं विरोधकांना बांगर यांनी अनेकदा नामोहरण केलं आहे. अशात परत एकदा बांगर चर्चेत आहेत.
संतोष बांगर यांच्या पत्राचा गैरवापर होत असल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यांच्या नावाच्या पत्रानं एसटी संपाला पाठिंबा देण्यात आला होता. ते पत्र व्हायरल झाल्यानंतर बांगर यांच्याकडून गैरवापर झाला आहे, अशी तक्रार देण्यात आली होती.
आता असंच एक पत्र व्हायरल होत आहे. संतोष बांगर विधानसभा सदस्य या नावाचं हे पत्र हिंगोली जिल्हाधिकारी यांना लिहिलं गेलं आहे. यामध्ये बांगर यांनी पोलीस त्रास देत असल्याचं म्हटलं आहे.
राजकीय विरोधकांचा सांगण्यावरून मला जाणीवपुर्वक बदनाम केलं जात आहे.हिंगोली पोलीस दलातील काही अधिकारी हेतुपुरस्पर लपणे मला लक्ष करून मानसिक त्रास देत आहेत. परिणामी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, अशा आशयाचं हे पत्र सध्या सर्वत्र व्हायरल झालं आहे.
आता हे पत्र संतोष बांगर यांनीच लिहीलं आहे की याचा देखील गैरवापर झाला आहे हे मात्र अद्यापी स्पष्ट नाही. परिणामी सध्या संतोष बांगर यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी मला मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली आहे. अशा अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा मी 18 जानेवारी रोजी बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असं या पत्रात म्हटलं गेलं आहे.
दरम्यान, आता या पत्रामुळं राज्यातील राजकारण मात्र तापलेलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील एका आमदाराला तक्रार करावी लागत आहे, अशी चर्चा सध्या होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तालिबान्यांचा यु-टर्न! लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता
किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ
विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव
अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद
शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…