मुंबई | अभिनेत्री करीना कपूर खान गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच सहा महिन्यांपूर्वी करीनाने आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. आपल्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानं नेटकऱ्यांनी तिच्यावर कडाडून टीका केली होती. करीनाने देखील ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं होतं.
अशातच आता सैफ अली खानने नुकताच कारीनाचा आई बनण्याबद्दल काय विचार होता, याविषयी मोठा खुलासा केला आहे. याविषयी बोलताना सैफ अली खान म्हणाला की, जेव्हा मी करीनाशी कुटुंब नियोजनाबद्दल बोललो तेव्हा करीनाच्या मनात मुलाला जन्म देण्याबाबत वेगळाच विचार आला होता.
सर्वसामान्य मुलींप्रमाणे आई होण्याआधी तिला देखील भीती वाटत होती. आई झाल्यानंतर तिच्या करिअरवर परिणाम होईल, अशी भीती तिला वाटत होती. तसेच तिला गर्भधारणेची भीती वाटत होती. यामुळे करीनाने सरोगसीच्या पर्यायाचा विचार केला होता, असा खुलासा सैफ अली खानने केला आहे.
तसेच पुढे बोलताना तो म्हणाली की, मी जेव्हा पहिल्यांदा तिच्याशी मुलांबद्दल बोललो तेव्हा ती थोडी आश्चर्यचकित झाली. यावेळी तिने सरोगसीचा पर्याय निवडण्याची इच्छा बोलून दाखवली होती. परंतु नंतर तिने तिचा विचार बदलला.
आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी शंभर टक्के देणं आवश्यक आहे, हे तिला नंतर समजलं आणि तिनं आपलं मन बदललं. पुढे तिने नैसर्गिकरित्या आपल्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा सैफ अली खानने केला आहे.
दरम्यान, करीना आता ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अमीर खान तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच करीना ‘तख्त’या चित्रपटामध्ये देखील झळकणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
सायरा बानोंची तब्येत खालावली, आयसीयुमध्ये उपचार सुरू
चक्क घरात शिरला बिबट्या अन्…, हलक्या काळजाच्या लोकांनी हा व्हिडीओ पाहु नका
माणुसकीला जागत कुत्र्याला वाचवण्यासाठी ‘या’ प्रकारे तरूणाने घेतली धाव, पाहा व्हायरल व्हिडीओ
अभिनेत्री रसिका सुनीलच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर होतीय चर्चा, पाहा व्हायरल फोटो