…म्हणून कियारा ‘शेरशाह’ चित्रपटात डिंपलची भूमिका साकारल्यानंतर रडली होती; वाचा सविस्तर

मुंबई | शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. विक्रम बत्रा हे कारगिल युद्धावेळी नायक होते. विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धवेळी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

एक धाडसी सैनिक म्हणून बत्रा यांची ओळख आहे. त्यांच्या जिवनात अनेक थरारक किस्से घडले होते. शेरशाह चित्रपटात त्यांच्या जिवनातील अनेक किस्से दाखवण्यात आले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. करण जोहर हा या चित्रपटाचा निर्माता आहे. शेरशाह या चित्रपटात बत्रा आणि डिंपल यांची लव्ह स्टोरी देखील दाखवण्यात आली आहे.

कियारा अडवाणीने या चित्रपटात डिंपलची म्हणजेच विक्रम बत्रा यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी कियाराने आता काही गोष्टींचा खुलासा केला आहे. तिने नुकतीच एका वाहिणीला मुलाखत दिली आहे.

मुलाखतीत बोलताना कियारा म्हणाली की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी डिंपलला मेसेज केला होता. त्यांच्यासाठी हा खूप भावनिक क्षण होता. त्यांचा भावनांचा आदर करत मी यावेळी त्यांच्याशी जास्त बोलणे टाळलं.

तसेच या चित्रपटानंतर विक्रम यांच्या कुटुंबाने देखील माझ्याशी संवाद साधला. त्यांनी या भूमिकेसाठी माझी खूप स्तुती केली. मी हुबेहूब डिंपलसारखी दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांचे हे शब्द ऐकून मला अश्रू अनावर झाले.

पुढे बोलताना कियारा म्हणाली की, चित्रपटापूर्वी मी डिंपलला भेटले होते. यावेळी त्यांनी मला त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. या गोष्टींची मला चित्रपटात भूमिका करताना खूप मदत झाली. हा चित्रपट पाहून डिंपल यांना नक्कीच आनंद होत असेल.

दरम्यान, भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या विक्रम बत्रा यांच्या जिवनावर आधारित असणाऱ्या शेरशाह चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे. बत्रा यांच्या आयुष्यातील अनेक थरारक किस्से या चित्रपटात पाहायला मिळत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

इंदिरा गांधींची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचे वडील होते इंदिरा गांधींचे खासगी पायलट

जिममध्ये तरुणावर अदृश्य शक्तीने केला हल्ला अन्…; हलक्या काळजाच्या लोकांनी व्हिडीओ पाहू नका

सीतेच्या भूमिकेसाठी करीनाने 12 कोटी रुपये मागितले का? करीना मौन सोडत म्हणाली…

“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

अरे बापरे! सलमान चक्क घोड्यासोबत खातोय चारा, व्हिडीओ व्हायरल