मुंबई | मागील दोन वर्षापासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
सरकार स्थापनेनंतर देखील शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद कायम राहिल्याचं पहायला मिळालं आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये जर पैसे घेऊन मतदान केलं तर मतदारांच्या मागे ईडी लागेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यावर संजय राऊत आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.
उत्पल पर्रिकरांचा पराभव झाला तेथेही ईडी चैाकशी लावली तर त्याचं स्वागत करू, असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये देखील ईडी लावणं गरजेचं असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील नंतर बघू, ईडी चैाकशीची सुरुवात आधी निवडणूका झालेल्या पाच राज्यांतून करावी, असंही राऊत म्हणाले आहेत. चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला तर खांद्याला खांदा लावून काम करू, असंही राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. त्यामुळे यावेळी मोठी खडाजंगी पुन्हा पहायला मिळणार असल्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सिगारेट पिणाऱ्यांनो… वेळीच व्हा सावध, नाहीतर डोळेही गमावून बसाल
“मनसे बिनबुडाची, त्यांना बुड नाही अन् शेंडाही नाही”
प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी; बाहेर आल्यावर म्हणाले “मला भंडावून…”
“मी टाईमपास टोळी म्हणायचो पण आता…”, आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर बरसले
Gold Silver Rate: सोने-चांदी दरात मोठी घसरण, वाचा काय आहे आजचा भाव