“…म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला नाही”, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम यांच्यात मालमत्ता व्यवहार झाल्याचा ठपका ईडीनं मलिक यांच्यावर ठेवला आहे.

मनी लाॅड्रिंग प्रकरणातही मलिक यांचा सहभाग असल्याचं ईडीकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता मलिकांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

नवाब मलिक हे मुस्लिम असल्यामुळे भाजप त्यांचा संबंध दाऊदशी जोडत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. त्यावरून चांगलाच वाद रंगला होता.

विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी मलिकांचा राजीनामा नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय.

हा जो अट्टहास आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अनिल देशमुख आणि राठोड यांचा राजीनामा का घेतला?, असा सवाल देखील यावेळी पाटलांनी विचारला आहे.

महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे. हे देखील लोकांना माहिती आहे. भाजपकडून काही शिकण्यासारखे आहे हे पवार साहेबांनी सुद्धा मान्य केलं, अशी खोचक टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग! बाळासाहेबांच्या वाक्याचा दाखला देत चंद्रकांत पाटील म्हणाले…

रशिया-युक्रेन युद्धात Elon Muskची उडी; आता ‘या’ देशाला मदत करणार

“ज्यांना मुलबाळ नाही, त्यांना कुटुंबीयांच्या वेदना काय कळणार?”

युरोपियन संसदेत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना स्टँडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट थांबेना; पाहा व्हिडीओ

पोस्टाची भन्नाट योजना! खातं उघडल्यावर मिळणार दरमहा ‘इतके’ हजार रूपये