“फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ नितेश राणेशी आहे”

मुंबई | गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण करण्यात येणार नाहीत तोवर संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

भाजपने सुरूवातीपासूनच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. भाजपचे अनेक नेते एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतं आहेत.

त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

‘महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी एकटे नाहीत हे सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे’, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच संपात फुट पाडण्याचा कोणी प्रयत्न केला तर गाठ नितेश राणेशी आहे, असं म्हणत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

शाहरूख खानचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नव्हती. पण राष्ट्रवादीला आमच्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल आणि भगिनीबद्दल काही वाटत नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सदाभाऊ खोतांना मला सांगायचं आहे की, दोन तीन मच्छर बाटलीत भरून द्या, ते अनिल परब यांच्या घरी सोडायचे आहेत. जेणेकरून मच्छर कसे चावतात हे त्या कारट्याला कळेल, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

तो तसा मुळचा आमच्या सिंधुदुर्गचा आहे, माझ्या मतदार संघाचा आहे, पण आमच्या मातीतून असा कारटा कसा निघाला हा संशोधनाचा विषय आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.

यावेळी नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आपण जे आंदोलन करत आहात मला आश्चर्य वाटते. मुख्यमंत्र्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली आहे, ते बरे असल्याची माहिती आहे. आमच्याही शुभेच्छा आहेत. परंतु, डॉक्टरांनी एक संशोधन केलंय या माणसाला कणा आहे का? पहायला पाहिजे, कारण कणा असलेला माणूस सामान्य माणसासोबत असं वर्तन करणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

विलीनीकरणावरून देखील नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. या लोकांना विलीनीकरण का नको, याचं कारण आहे. वाय फाय असो किंवा टायरच्या किंमतीमध्ये कमिशन कसं खाणार? तसेच शासनामध्ये विलीनीकरण झालं तर अनिल परब वसुली कशी करणार? असे प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केले.

इतक्या दिवस तुम्हाला इथे बसवलं आहे. एकही आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी येथे येत नाही. ‘आमच्या राष्ट्रवादीच्या ताई आहेत. त्या म्हणाल्या आर्यन खान जेलमध्ये असल्यानं त्याच्या आईला काय वेदना होत असतील याचं दु:ख तुम्हाला आई म्हणून कळतयं. ताई असंख्य महिला इथं बसल्यात त्यांचं वाईट तुम्हाला वाटत नाही’, असा टोला नितेश राणे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“नवाब मलिक हा गद्दार, त्याला पाकिस्तानला पाठवा”

अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

कडक सॅल्युट! भर पावसात महिला अधिकाऱ्यानं तरुणाला खांद्यावर उचलून नेत वाचवले प्राण

  “जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”

“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये”