…म्हणून रियाच्या भावाला कधीही होऊ शकते अटक?; सुशांतच्या प्रकरणात अखेर रियाच्या भावाचं नाव आलं समोर!

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात सध्या अनेक नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. सुशांतच्या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयही वेगाने तपास करत आहे. सध्या ड्र.ग्जपर्यंत या प्रकरणाचा तपास आला आहे.

सुशांतच्या प्रकरणात पुर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात असलेली सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले जात आहेत. रियाच्या कुटुंबावरही अनेक आरोप केले जात आहेत. सुशांतच्या कंपनीत रियाचा भाऊ शौविक यांनी सुशांतचे पैसे उधळले असल्याचं बोलत आहेत. कारण जेव्हा रिया आणि सुशांत परदेशात गेले होते तेव्हा शौविकलाही नेण्यात आलं होतं.

सुशांतच्या घरी रियाचं कुटूंब नेहमी असायचं. मात्र तपासात शौविकचं नाव कुठेही आलं नव्हतं. मात्र एनसीबीच्या टीमने बॉलिवूडला ड्र.ग्ज पुरणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या ड्र.ग्ज पेडलरचे आणि शौविकसह रियासोबत थेट संबंध असल्याचं माहिती समजत आहे. यासंगर्भात टाइम्स नाउने वृत्त दिलं आहे. त्यामुळे रियाच्या भावालाही अटक होण्याची शक्यता आहे. यातील एकाचं नाव परवेज खान उर्फ चिंकू पठाण असल्याची माहिती समजत आहे. चिंकू पठाण बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांच्या घरी काम करणाऱ्या अनेकांच्या संपर्कात होता.

तो चिंकू हा कोड वापरून अनेकांना ड्र.ग्जचा सप्लाय करत होता. सुशांतच्या घरात काम करणारा एक व्यक्ती देखील चिंकू पठाणच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे.

ड्र.ग्ज पेडलरला अटक करण्यात आली आहे त्यांच्या चौकशीतून रियाचा भाऊ शौविक आणि रियासह बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समजल्याची महिती आहे. एनसीबीही संबंधित मोठ्या कलाकाकरांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे.

मुंबईमधील वांद्रे, जुहू आणि लोखंडवाला या भागांमध्ये होणाऱ्या बॉलिवूडच्या पार्ट्यांना ड्र.ग्ज घेतलं जात असल्याचं ड्र.ग्ज पेडलरने सांगितलं. दरम्यान रियावर ड्र.ग्जचा वापर करणे आणि डीलींग करण्याचा आरोप आहे.

सीबीआय चौकशीत रियाच्या व्हाट्सअ‌‌ॅपच‌‌‌‌ॅटमध्ये ड्र.ग्ज संदर्भातच्या च‍ॅटिंग मिळाली होती. त्यामुळे रियावर संशय वाढला. मात्र रियाने आज तक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत.

रिया आणि रियाचा भाऊ शौविक यांनी मिळून कपंनी तयार केली होती. यामध्ये तिघांनी 35000 हजार रूपये गुंतवले होते. यामध्ये रियाने आपल्या भावाचे पैसे आपण स्वत: भरले असल्याचं सांगितलं.

रियावर सुशांतच्या बँक खात्यातले पैसे काढल्याचा आरोप होत आहे. हे सर्व आरोप रियाने फेटाळून लावले आहेत. तिचं म्हणणं आहे की माझं आणि सुशांतचे बँक ट्रांझीशन पाहिल तर त्या कंपनीला गुंतवणूक म्हणून तिचे आणि तिच्या भावाचे पैसे पाठवलेले पैसे सोडून कोणतंही ट्रांझीशन नसल्याचं रियाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

किरीट सोमय्या यांनी फक्त भो भो न करता आरोप सिद्ध करून दाखवावेत- किशोरी पेडणेकर

‘सुशांतच्या ह.त्येचे पुरावे…’; सुशांत प्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा धक्कादायक खुलासा!

काँग्रेसला साठ वर्ष दिलीत मला साठ महिने द्या, मोदीजी आठवतंय का?- कपिल सिब्बल

शिवसेनेला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ शिवसैनिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला

‘या’ कारणासाठी रियानं सोडलं होतं सुशांतचं घर; रियाच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा!