…म्हणून सई ताम्हणकर मराठी चित्रपटांपासून दुरावली!

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि दर्जेदार अभिनय करणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. सईनं मराठीच नव्हे तर हिंदीमध्येही आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. अशातच काही दिवसांपासून सई मराठी चित्रपटसृष्टीत कमी दिसत असलेली पाहायला मिळत आहे.

‘फ्री प्रेस जर्नल’ या वृताशी संवाद साधताना सईला मराठी चित्रपटसृष्टीपासून दूरावल्याचं विचारलं. तेव्हा सईनं म्हटलं की, तुमच्या कारकिर्दीत अशी वेळ येते की तुम्हाला वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी कुठून निघून कुठेतरी पोहचावं लागतं. एक कलाकार म्हणून तुम्हाला आणखी वेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो आणि यामुळे तुम्हाला एक आनंद मिळतो, समाधान मिळतं.

पुढे सईनं म्हटलं की, प्रत्येक काम नवनवीन टीमसोबत करायला एक नवीन मजा असते. याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीनंही माझा अभिनय दाखवण्याची संधी दिली म्हणून मीही त्यादिशेनं पाऊल टाकलं.

सईनं अलीकडेच ‘डेट विथ सई’ या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारुन डिजिटल विश्वात पदार्पण केलं. याशिवाय सई ताम्हणकर नवरसा या तमीळ सीरिजमध्ये देखील झळकली. नुकतंच सईनं नेटफ्लिक्सवरील ‘मीमी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली आहे. यात पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेत दिसले होते. 

सई मूळची सांगलीची असून तिने कॉलेजमध्ये असतानाच अनेक नाटकांंमध्ये आणि एकांकिकांमध्ये सहभाग घेतला होता. तिच्या आईच्या मित्राने दिग्दर्शित केलेल्या नाटकातून ती अभिनयात उतरली. नाटकानंतर सईनं अनेक मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर ती चित्रपटांमध्ये झळकली.

सई ताम्हणकरनं 2008 मध्ये दिग्दर्शक सुभाष घईंच्या क्राईम थ्रिलर ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये मुख्य भूमिका साकारत ऑन-स्क्रीन पदार्पण केले. त्याच वर्षी तिने ‘सनई चौघडे’च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

सईनं आपल्या दमदार अभिनयानं, वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवलं. आता हिंदी चित्रपटसृष्टीतही तिची ही जादू दिसायला लागली आहे. त्यामुळे तिचे चाहते तिला आणखी वेगळ्या भूमिका साकारताना बघण्यासाठी उस्तुक आहेत.

महत्वाच्या बातम्या –  

पवनदीपच्या खासगी गोष्टीचा अरुणीताकडून खुलासा, म्हणाली…

मी आता केक कापणार नाही तर…; बर्थडेवरून भडकलेल्या गर्लफ्रेंडने उचललं ‘हे’ पाऊल; व्हिडीओ व्हायरल

सेटवर राखीला चावला कुत्रा, राखी म्हणतेय मी देखील त्याला चावणार; पाहा व्हिडीओ

रिंकू राजगुरुचा आपल्या रिलेशनशिपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली…

धक्कादायक! बिग बाॅसच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवला बाहेरचा रस्ता