…म्हणून शरद पवारांनी बाहेरुनच घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

पुणे | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं.

शरद पवारांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन बाहेरुनच घेतल्यानं पुन्हा एकदा नव्या मुद्द्याला तोंड फुटलं आहे.

पवारांनी बाहेरुनच दर्शन घेतल्यानं पवार नास्तिक आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर आता शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

मी नाॅनव्हेज खाल्लं आहे, त्यामुळे मंदिरात जाणं माझ्या बुद्धीला पटत नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली आहे.

गृह विभागाची जागा दगडूशेठ ट्रस्टला देण्याचे अनेक दिवसांची मागणी होती. त्यासाठी शरद पवार भिडे वाडा आणि दगडूशेटची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बाहेरुन गणपतीचं दर्शन घेतलं.

मांसाहार केल्यामुळे शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेचं अनेकांनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  कोरोनाविषयी मुख्यमंत्र्यांचं सूचक आवाहन, म्हणाले…

  मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल

  Gold Rate | सोने-चांदीच्या दरात वाढ, वाचा ताजे दर

  आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट आली समोर!

  “स्वाभिनाने जगणारा संभाजी छत्रपती आहे, कोणासमोर झुकून मी खासदारकी घेणार नाही”