…म्हणून स्वरा भास्कर झाली भावुक, पाहा व्हिडीओ

मुंबई | अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. कोणत्याना कोणत्या विषयामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असतेच. आज स्वराचा वाढदिवस आहे. यासंदर्भात तिने एक आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये स्वरा भावुक झालेली पाहायला मिळतं आहे. स्वराचा आज वाढदिवस असल्यामुळे तिला तिचे चाहते मित्र-मैत्रीणी शुभेच्छा देत आहेत.

व्हिडीओमध्ये स्वराला तिच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यात आलं असल्याचं दिसत आहे. त्यात ती एक कापनाही दिसत आहे. केक कापता-कापत अचानक तिला तिचे अश्रू अनावर झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे. स्वराच्या कुटुंबियांनी आणि तिच्यासोबत काम करण्यांनी तिला हे सरप्राईज दिलं असल्यामुळं ती जास्तच भावुक झाली.

हा व्हिडीओ पोस्ट करताना स्वराने एक छानसं कॅप्शनही दिलं आहे. ‘माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या पालकांनी आणि माझ्या सोबत काम करणाऱ्या माझ्या मित्रांनी माझा वाढदिवस साजरा केला आहे. हा वाढदिवस अॅडव्हान्समध्ये साजरा केल्यानं मी सरप्राइज झाले. मी या जगातील सर्वात नशिबवान व्यक्ती आहे, जिला असा परिवार आणि मित्र मिळाले आहेत.’ असं तीने कॅप्शन दिलं आहे.

तसेच स्वरा भास्करला तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांकडून शुभेच्छा आल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी तिली सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सोनम कपूरने स्वराला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनम कपूरने स्वरासोबतचा फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोबतच ‘प्रिय बहिण, आपण एके दिवशी गप्पा मारल्या आणि असं वाटलं की ही मैत्री देवानं बनवली आहे. तु चित्रपटात साक्षी, बिंदिया आणि चंद्रिका. ज्या काही व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. त्यामध्ये तुझी ऑफ स्क्रीन व्यक्तीरेखा माझी सर्वात आवडती आहे. वेळेनुसार तुझा आवाज आणखी बुलंद होवो. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.’ असं कॅप्शन सोनमने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

महत्वाच्या बातम्या-

प्रियंका चोप्राच्या बिकिनी अवतारात दिसली राखी सावंत, पाहा…

प्रेग्नेंसीमध्ये अभिनेत्री दिया मिर्झा अशी घेतेय स्वतःची…

विमानात प्रवासादरम्यान तरूणाने असं काही केलं की, तातडीने…

‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन,…

आता आधार कार्डवरही लावता येणार आपल्या आवडीचा फोटो, वाचा…