औरंगाबाद | कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने आपल्या मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली होती. समिना रुस्तम शेख यांनी आपल्या समीर आणि आयेशा नावाच्या जुळ्या मुलांसह हाताची नस कापून घेतली होती. समिना आणि आयेशा जागीच मृत्यू पावले तर समिरवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मात्र, आता रुग्णालयात उपचार चालू असणाऱ्या समीरच्या जबाबावरून या घटनेला नवीन वळण मिळालं आहे.
सुरुवातीला कुटुंबाची सामुहिक आत्महत्या वाटणारं प्रकरण आता आईने मुलीची हत्या या वळणावर आलं आहे.समीरने दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, समिनाने आपली मुलगी आयेशा हीचा पहिला गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने समीरला त्याची नस कापून घ्यायला सांगितली. आईने सांगितल्याप्रमाणे समिरनेही आपल्या हातावर आणि गळ्यावर ब्लेड मारून घेतलं. नंतर समिनाने स्वतः गळफास घेत आत्महत्या केली.
तपासाचा भाग असल्याने पोलीस या गोष्टीवर बोलणं टाळत आहेत. मात्र, समीरच्या मावशीनं ही सर्व माहिती दिली आहे. समिना शेख आणि रुस्तम शेख यांनी प्रेमविवाह केला होता. यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. मात्र, पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पत्नीने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.
या प्रकरणात आणखी काही नवीन धागे दोरे हाती लागू शकतात, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी समीरची कसून चौकशी केली आहे. पोलीस सध्या 4 जुलै रोजी नेमकं शेख कुटुंबात काय घडलं याचा उलघडा करायचा प्रयत्न करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अखेर ठरलं, T-20 विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे, तर स्पर्धा होणार या वर्षी!
तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक
चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध!
एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकडे
सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलं