…म्हणून मामा भाच्यातील वाद पेटला; वाचा गोविंदा आणि कृष्णातील भांडणाचं कारण

मुंबई | बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक या दोन्ही मामा भाच्यातील वाद आज जगजाहीर आहे. या दोन्ही मामा भाच्यातील वादाचं नेमकं कारण काय? याविषयी अनेकांना माहीत नाही.

नुकतंच ‘द कपिल शर्मा शो’च्या एका भागात गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा उपस्थित राहिले होते. मात्र, गोविंदाचा भाचा कृष्णा या भागास अनुपस्थित राहिला. यामुळे पुन्हा या मामा भाच्यातील वाद चव्हाट्यावर आला.

गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांच्यातील वाद इतका वाढला आहे की, दोघेही एकमेकांसमोर येण्यास टाळाटाळ करतात. आपल्या मामाशी आपले संबंध ठीक व्हावेत म्हणून कृष्णा सतत प्रयत्न करत असतो. परंतु अजूनही त्यांच्यातील वाद आहे तसाच आहे. आज आपण जाणुन घेऊयात याच वादामागचं कारण.

कृष्णा एका रिऍलिटी शोमध्ये काम करत होता त्या शोमध्ये गोविंदा एक दिवस प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. गोविंदा ज्यादिवशी शोमध्ये येणार त्याच दिवशी कृष्णाची पत्नी अभिनेत्री कश्मिरा शाह हिने एक ट्विट केलं होतं. हेच ट्विट मामा भाच्याच्या वादाचं कारण ठरलं.

काही लोक असे आहेत जे पैशासाठी डान्स करतात, असं ट्विट कश्मिराने केलं होतं. कश्मिराचं हे ट्विट गोविंदाचा पत्नी सुनीता आहुजा यांना त्यांच्या पतीसाठी म्हणजेच गोविंदासाठी हे ट्विट असल्याचं वाटलं. यामुळे त्या कृष्णावर नाराज झाल्या.

पुढे कृष्णाने गोविंद आणि त्यांच्या पत्नीची माफी मागितली. मात्र, कश्मिरा तिची चूक मान्य करायला तयार नव्हती. यामुळे सुनीताला याचा आणखी राग आला. गोविंदा आणि कृष्णातील वादाचं हेच कारण आहे.

दरम्यान, मागील वर्षी देखील गोविंदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहचला होता.मात्र त्यावेळी देखील कृष्णा शोमध्ये हजर राहिला नाही. यामुळे यांच्यातील भांडण जगजाहीर झाले.

महत्वाच्या बातम्या-

दुसऱ्या तरूणीसोबत गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं, अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे गजाआड जाणार?

सिद्धार्थच्या मृत्यूमुळे कोलमडलेली शेहनाज ग्लुकोजवर? डिझायनरने केला खुलासा

सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लवकरच अडकणार लग्नबंधनात? शाहिरचा मोठा खुलासा

‘हेल्मेट घालूनच पहिला कंडोम विकत घेतला होता’; ‘या’ बड्या अभिनेत्याने शेअर केला मजेशीर किस्सा