…म्हणून भरमंडपात नवरदेवासमोरच नवरीने मामासोबत घेतले फेरे; व्हिडीओ व्हायरल

मुंबई | सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला चांगली शिकवण देणारे असतात तर काही व्हिडीओ आपलं मनोरंजन करणारे असतात. बऱ्याचदा लग्नातील माजमस्तीचे, विधींचे व्हिडीओज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सध्या अशाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये नवरी आपल्या मामासोबत नवरदेवाच्या चारही बाजूने फेरे घेताना दिसत आहे. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकित होत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंचीने बराच मोठा असणारा नवरदेव पाटावर उभा आहे. नवरी नवरदेवापेक्षा उंचीने लहान आहे. नवरी पाठावर उभ्या असणाऱ्या नवरदेवावर फुले उधळत आहे.

या व्हिडीओमध्ये लग्नातील वेगवेगळे विधी पार पडताना दिसत आहेत. यानंतर नवरी आपल्या मामासोबत नवरदेवाच्या चारही बाजूने फेरे घेताना दिसत आहे. ही नवरी आपल्या मामासोबत फेरे का घेत आहे? हे त्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनवरुन स्पष्ट होत आहे.

लग्नाचा हा व्हिडीओ wishnwed या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने व्हिडीओला ‘मामासोबत फेरे, मारवाडी वेडिंग ट्रॅडिशन’ असं कॅप्शन दिलं आहे. तसेच मामासोबत फेरे घेणे ही मारवाडी लग्नातील एक परंपरा आहे. तुमच्या संस्कृतीमध्ये अशा कोणत्या वेगळ्या परंपरेचं पालन केलं जातं का?, असा सवाल देखील या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

नवरीला मामासोबत फेरे घेताना पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करत आपलं मत व्यक्त करत आहेत. एक युजर या व्हिडीओवर कमेंट करत आपण अशी प्रथा कुठेच पहिली नसल्याचं बोलत आहे.

एका युजरने कमेंट करत ही प्रथा सविस्तरपणे समजावून सांगितली आहे. तो म्हणाला की, हे मामासोबत फेरे नाहीत तर मारवाडी लोकांमध्ये अशी प्रथा आहे की, मामा आपल्या भाचीला मुलीप्रमाणे मानून तिचा हात हातात घेऊन नवरदेवाच्या चारही बाजूने फेरे घेतो.

https://www.instagram.com/reel/CSeamC9DLiv/?utm_source=ig_embed&ig_rid=bcfabd61-2700-447d-b0f5-096ad3d5f09a

महत्वाच्या बातम्या –

लग्नानंतर सात महिन्याने वरूण धवनने केला मोठा खुलासा, म्हणाला…

ऐकावं ते नवलंच! मोबाईलच्या नादात भररस्त्यात आई बाळाला विसरली अन्…; पाहा व्हिडीओ

‘चुक केली पण…’, शिल्पाच्या पोस्टनं वेधलं अनेकांचं लक्ष

अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज!

…म्हणून सई ताम्हणकर मराठी चित्रपटांपासून दुरावली!