…म्हणून छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना ‘या’ व्यक्तीने चाबकाचे फ.टके दिले

रायपूर | सध्या संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. रविवारी गोवर्धन पूजेचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला. देशातील प्रत्येक भागात तिथल्या प्रथेनुसार दिवाळी सण साजरा केला जातो. छत्तीसगड या राज्यात गोवर्धन पूजेला एक अनोखीच प्रथा पार पाडली जाते.

गोवर्धन पूजेच्या दिवशी छत्तीसगडचे मुख्यमंत्री राज्यातील जनतेचा सुखसमाधानासाठी चाबकाचे फ.टके मारून घेतात. गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा छत्तीसगडमध्ये चालत आलेली आहे. याहीवर्षी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी ही प्रथा पार पाडली आहे.

भुपेश बघेल यांनी छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यातील जंजगिरी कुम्हारिमध्ये चाबकाचे फ.टके झेलण्याची परंपरा पार पाडली आहे. भुपेश बघेल यांनी स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दुर्ग जिल्ह्यातील जंजगिरी कुम्हारी गावात जाऊन सर्वांच्या सुखसमाधानासाठी चाबकाचे फ.टके खाण्याची परंपरा मी पार पाडली. ही सुंदर परंपरा सर्वांच्या सुखसमाधानासाठी साजरी केली जाते, असं ट्विट बघेल यांनी केलं आहे.

यासोबत त्यांनी चाबकाचे फ.टके खातानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तसेच भुपेल यांनी या ट्विटनंतर आणखी एक ट्विट करत गोवर्धन पूजेची दरवर्षीची प्रथा आणि यावर्षीची प्रथा यात काय बदल दिसला हे देखील सांगितलं आहे.

पुढे ट्विट करत भुपेश बघेल म्हणाले की, यावर्षी या परंपरेमध्ये एक बदल मला दिसून आला. पूर्वी गावातील जेष्ठ भरोसा ठाकूर मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फ.टके देत असत. मात्र, यावर्षी भरोसा ठाकूर यांच्या निध.नामुळे त्यांचे पुत्र विरेंद्र ठाकूर यांनी ही परंपरा पूर्ण केली आहे.

दरम्यान, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी निसर्गाची पूजा केली जाते. या दिवशी अन्नकुट आणि गोवर्धन पूजा केली जाते. या प्रथेची सुरुवात भगवान श्रीकृष्णाने केली होती, असं मानलं जातं.

गोवर्धन पूजेच्या दिवशी प्रकृतीच्या आधाराच्या रुपात गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. तसेच या दिवशी समाजाचा आधार म्हणून गाईची पूजा केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या-

चित्रपट सृष्टीला आणखी मोठा धक्का! पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त ‘हा’ दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड

धक्कादायक! घटस्फो.ट घेण्याआधी भर कोर्टात पत्नी म्हणाली मला पतीपासून गरोदर…

दिवाळीत सुशांतच्या चाहतीने केलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सोशल मीडियावर झालं भरघोस कौतुक

कतरिनाचे ‘हे’ फोटो तुम्हाला करतील घायाळ! वाचा कतरिना कुठे करतेय हे फोटोशूट?

हिंदू दिवाळी सण का साजरी करतात? सविस्तर वाचा 3000 वर्षांपूर्वी आर्यकाळात काय घडलं होतं?