‘…म्हणून वडिलांचा जीव वाचवता आला नाही’; रितेश देशमुखनं सांगितलं विलासरावांच्या मृ.त्यूचं खरं कारण

मुंबई | प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांच्या पाठीमागे त्यांची आठवण आल्यावर हळवा होतो. नुकतंच रितेश देशमुखही आपल्या वडिलांच्या आठवणीत भावुक झाल्याचे दिसून आले.

9 ऑक्टोबर रोजी ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम झाला. शुक्रवारी या कार्यक्रमाचा कर्मवीर हा विशेष भाग होता. यामध्ये मोहन फाउंडेशनचे संस्थापक डॉ.सुनील श्रॉफ आणि अभिनेता रितेश देशमुख सहभागी झाले होते.

डॉ.सुनील श्रॉफ हे अवयवदान चळवळीस प्रोत्साहन देणारे व्यक्ती आहेत. त्या दिवशी अवयवदान या महत्त्वाच्या विषयाशी निगडित हा विशेष भाग प्रदर्शित केला होता. या विशेष भागात रितेश देशमुख यांना अवयवदान उपक्रमाविषयी प्रश्न विचारला.

त्यावेळी रितेश देशमुख भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर यात रितेश देशमुखला त्याचे वडील आणि महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

त्यावेळी रितेश देशमुखनं सांगितले की, माझे वडील विलासराव देशमुख यांचे यकृत प्रत्यारोपण करायचे होते. ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.

आम्हा सर्वांना वाटले की, शस्त्रक्रिया करण्यासाठी यकृत उपलब्ध होईल पण ते उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वडिलांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता पण काही वैद्यकीय अडचणींमुळे ते शक्य झाले नाही, अशी माहिती रितेश देशमुखनं दिली आहे.

यानंतर या कार्यक्रमातुन रितेश देशमुखनं सर्व नागरिकांना अवयवदान करण्यासाठी विनंती केली. ज्यांना अवयवांची गरज असते, त्या सर्व रुग्णांची प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी यादी बनवली जाते.

ज्या रुग्णांची तब्येत खालावते आणि त्यांची प्रकृती बिघडत जाते यांना प्रथम प्रत्यारोपण करण्यासाठी प्राथमिकता दिली जाते. यावेळी त्या रुग्णांना अवयवांची गरज असते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदान करण्यास पुढे यावे, असे रितेश देशमुखनं कार्यक्रमातुन आवाहन केलं आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा रितेश देशमुख आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. 26 मे 2020 रोजी विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रितेशनं सोशल मीडियावर अगदी भावुक करणारा व्हिडिओ टाकला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

भडकावू बातम्या पसरवणाऱ्या वाहिन्यांविरोधात पार्लेजी कंपनीनं घेतला मोठा निर्णय

सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी! रियाला पाठींबा देत म्हणाला…

मित्रांच्या मदतीने त्याला मिळाले नवीन आयुष्याचे गिफ्ट; सोनू सूदही मदतीसाठी धावला

सुशांत प्रकरणी आता अमित शहांनी देखील सोडलं मौन; महाराष्ट्र सरकारवर आरोप करत म्हणाले..

‘केबीसी’तील अमिताभ बच्चन यांचा ‘तो’ प्रसिध्द डायलॉग कोणी लिहिला आहे? वाचा सविस्तर