Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘…म्हणून राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतलं आहे’; प्रसाद लाड यांचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | अलीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्षनेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाहीत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाची खेळी सातत्यानं चालू आहे. अशातच आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांवर व्यक्तिगत ह.ल्ले करण्यासाठी राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना पक्षात घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी खडसेंना अगदी डोक्यावर चढवून घेत आहे, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

तसेच खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचं काहीही नुकसान होणार नाही. खडसे इतक्या ताकदीचे नेते होते तर स्वतःच्या मुलीला निवडून का आणू शकले नाहीत?, असा सवालही प्रसाद लाड यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला नुकसान सहन करावं लागणार अशा चर्चा सध्या चालू आहेत.

खडसे यांच्या पक्षांतरानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 20 आणि 21 तारखेला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यावेळी खडसे आपलं शक्ती प्रदर्शन करतील असंही बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर लाड यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता लाड यांनी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे दौरे करत आलेले आहेत. त्यांचा हा दौराही काही नवीन नाही. शरद पवार यांच्या तो आवडीचा विषय आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या जिल्ह्यात दौरा केल्यानं इथे भारतीय जनता पार्टी कमकुवत होईल असं मानण्याचं कारण नाही, असं लाड यांनी यावेळी सांगितलं आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्रात भाजपला व नरेंद्र मोदींना मानणारा एक मोठा वर्ग आहे. भाजप पक्ष स्वतः समर्थ आहे. आमच्या पद्धतीने आम्ही सर्व गोष्टी करत आहोत, असंही प्रसाद लाड म्हटले आहेत.

प्रसाद लाड यावेळी खडसेंवर निशाणा साधत म्हणाले की, एकनाथ खडसे यांचा उलटा प्रवास आता सुरू झाला आहे. स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरू आहे. त्यांना जे करायचं ते करुद्या.

महत्त्वाच्या बातम्या-

टायगर श्रॉफच्या बहिणीचा ‘त्या’ घटनेबद्दल मोठा खुलासा! स्वतः सोशल मीडियावर म्हणाली…

सुशांतच्या मृ.त्युनंतर देखील अंकिताने केलं ‘ते’ कृत्य, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल

धक्कादायक! पतीच्या मृ.त्युनंतर ‘या’ गावात पत्नीच्या शरीराचा हा भाग का.पला जातो

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नव्हता! शिवसेना नेत्यांचा ‘तो’ दावा खोटा?

अमिताभ यांनी ‘ते’ अ.श्लील कृत्य केलं अन् मग अमृताने त्यांच्या कानाखाली वाजवली; वाचा सविस्तर