पत्नीनं मारहाण केल्याचा आरोप; चक्क पोलिसानंच पोलीस ठाण्यात दिली तक्रार

पुणे | पुण्यातील पिंपरी परिसरात पोलीस कर्मचाऱ्याला पत्नीनं आणि मुलांनी लाथा बुक्यांनी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी गणेशनगर, बोपखेल परिसरात ही घटना घडली आहे.

‘रात्री फोनवर कोणासोबत बोलतेस’, असं 55 वर्षीय पोलीस नवऱ्यानं आपल्या पत्नीला विचारलं. नवऱ्यानं संशयास्पद रितीने विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्यानं पत्नीनं त्याला उलथण्यानं मारलं. पत्नीनंतर दोन्ही मुलांनी वडिलांचा गळा दाबत लाथा, बुक्क्यांनी मारहान केली. तसंच मुलांनी वडिलांना हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकीही दिली.

घटनेनंतर 55 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यानं दिघी पोलीस ठाण्यात धाव घेतली. फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्यानं सांगितलेली घटना ऐकून दिघी पोलिसांनाही नवल वाटलं. दिघी पोलिसांनी 44 वर्षीय पत्नी 24 वर्षीय मुलगा आणि 22 वर्षीय मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस लष्करातील निवृत्त कर्मचारी असून सध्या मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. ते वैद्यकीय रजेवर घरी आले असताना हा सर्व प्रकार घडला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कराल तर याद राखा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू”

“निषेध! कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी”

आमदाराच सांगत आहे, ‘मी लाईट बिल भरणार नाही, तुम्हीही भरु नका मी तुमच्यासोबत आहे’

चांगली बातमी! एसटी कर्मचाऱ्यांनो आपली बँक खाती तपासून पहा, ‘या’ महिन्यापासूनचे पगार झालेत जमा!

इंदोरीकरांच्या पुत्रप्राप्तीच्या ‘त्या’ वक्तव्यावर न्यायालयानं बजावली महत्वाची भूमिका