कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने महिलेने जुळ्या मुलांसह उचलंंलं हे मोठं पाऊल; थरकाप उडवणारी गोष्ट

औरंगाबाद | कोरोनाने गेल्या कित्येक महिन्यांपासून जगात थैमान घातलं आहे. लोकांच्या मनात कोरोनाविषयी दहशत अजुनही बनून आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीने आपल्या जुळ्या मूल्यांसह स्वतःची नस कापल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथून समोर आली आहे.

समिना शेख यांनी पंचवीस वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसाय करणाऱ्या रुस्तम शेख यांच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर या दोघांना समीर आणि आयेशा अशी दोन जुळी मुले झाली. दरम्यान, रुस्तम शेख यांना कोरोनाची लागण झाल्याने रुस्तमचं जर काही बरं वाईट झालं तर मी माझ्या मुलांसह आत्महत्या करेल असं समिना सतत म्हणत होत्या.

31 जुलै रोजी पतीच्या झालेल्या मृत्यूमुळे समिना आणि त्यांच्या मुलांना जबर धक्का बसला. समिना यांनी टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून नातेवाईक त्यांच्याबरोबर राहत होते. मात्र, मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर समिना आपल्या मुलांसह रूममध्ये गेल्या आणि रूमचा दरवाजा लावून त्यांनी आपल्या मुलांसह स्वतःच्या हाताची नस कापून घेतली.

घटनेची चाहूल लागताच नातेवाईकांनी शेजारांच्या मदतीने दरवाजा तोडला असता समिना, आयेशा आणि समीर बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी समिना शेख आणि आयेशा शेख यांना मृत घोषित केलं तर समीर शेख याच्यावर औरंगाबाद मधील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

महत्वाच्या बातम्या-

पाऊस चाकरमान्यांच्या जीवावर उठला; रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतंय’; गिरीश महाजनांचा मुख्यमंत्र्यांना टोला

…म्हणून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंंत्री उद्धव टाकरेंना केला फोन; म्हणाले…

भारतरत्न लतादीदींनी राम मंदिराचं श्रेय दिलं ‘या’ दोन महत्वाच्या नेत्यांना!

अयोध्येत राम मंदिराचं काम सुरु; आता पाकिस्तानात सुरु झाली कृष्ण मंदिर बांधण्याची मागणी