Top news मनोरंजन महाराष्ट्र

‘….म्हणून दिखावा करण्याची काही गरज नाही’, सु्ट्टीवर जाणाऱ्या कलाकारांवर भडकली ‘ही’ अभिनेत्री

Photo Credit - Shruti Haasan / Instagram

मुंबई| गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळाला होता. परंतू फेब्रुवारीपासून कोरोना रोगाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं दिसतं आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

दुसरीकडे देशातील राजकारण देखील दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. औषधे, ऑक्सिजन यांचा पुरवठा अपुरा पडत आहे. जवळपास सगळ्याच राज्यांची हालत खराब आहे.

अशात गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जाणं पसंत करत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक जण मालदीवला गेल्याचं दिसून आले. मात्र या सेलिब्रिटींवर बाॅलिवूड अभिनेत्री श्रुती हसनने संताप व्यक्त केला आहे.

श्रुति हसनने वाढत्या करोना संक्रमणावर चिंता व्यक्त करत अशा वेळी सुट्टीवर जाणाऱ्या सेलिब्रिटींवर नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटींचं वर्तन असंवेदनशील असल्याचं ती क्विंटला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाली आहे. ती म्हणाली, “मला आनंद आहे की त्यांना एक चांगली सुट्टी मिळाली. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र वैयक्तीक मला या काळात मास्क न घालता पूलमध्ये मज्जा करणं योग्य वाटत नाही. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे आणि काहींसाठी तर खूपच खडतर.”

पुढे ती म्हणाली, ” मला वाटतं तुमच्याकडे ज्या सुखसोयी आहेत त्यासाठी तुम्ही आभारी आणि कृतज्ञ असायला हवं. तुमच्याकडील सुखसोयींचा लोकांसमोर दिखावा करण्याची ही गरज नाही.” असं म्हणत सोशल मीडियावर सुट्टीचे फोटो पोस्ट करणाऱ्यांवर तिने निशाणा साधला.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर माझे काही मित्र सुट्टीचे प्लानिंग करत होते. मात्र मी त्यांना नकार दिला. इतकेच नाही तर त्यांनाही सुट्टीवर जाण्यास मनाई केली, असंही श्रुतीने यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी रॅपरनं आलिया भट्टवर बनवलं रॅप; रॅप ऐकून आलिया…

‘तीन मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा’,…

12 वर्ष लहान असलेल्या करीनाशी लग्न का केलं? सैफ अली खाननं…

‘या’ अभिनेत्रीला एकदा सोडून दुसऱ्यांदा झाली…

रितेश देशमुखचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल,…

IMPIMP