मुंबई| सोशल मीडियावर नेहमी काही न काही व्हायरल होत असतं. सोशल मीडियावर दररोज विविध कारणांवरून वाद-प्रतिवाद सुरु असतात. अशातच सध्या एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं दिसत आहे.
टॉयलेटचा दरवाजा अर्धा उघडा ठेवत क.मोडवर बसलेला हा फोटो एका महिलेने शेअर केला आहे. या फोटोनं एका वेगळ्याच विषयाला तोंड फो.डलेलं पहायला मिळालं. या फोटोमुळं फेसबुकसह सोशल मीडियावर संस्कृतीरक्षक विरुद्ध उदारमतवादी असा वाद रंगलेला पहायला मिळाला.
गीता यथार्थ भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात कार्यरत असून त्या एकल पालक आहेत. गीता यांनी आपला दरवाजा अर्धा उघडा ठेवत कमोडवर बसलेला फोटो शेअर केला आहे. सिंगल पॅरेंट असल्यामुळे गीता यांना आपल्या लहान मुलाची सतत काळजी घ्यावी लागते. त्यामुळे गीता यांना अगदी बाथरुमला जातानाही मुलाला एकटे सोडता येत नाही. त्यामुळेच आपण बाथरुमला जाताना दरवाजा बंद करत नाही, असे गीता यथार्थ यांनी सोशल मीडियावर सांगितले होते.
फोटोसोबत त्या लिहितात, ‘मी टॉयलेटचं दार सर्वात शेवटी कधी बंद केलं होता, मला आठवत नाही. आता तर परिस्थिती अशी आहे, की ऑफिसमध्येही टॉयलेटचं दार बंद करणं लक्षात राहत नाही अनेकदा. आणि आता मुलाला फोटो काढणंही जमायला लागलं आहे.’ या पोस्टला त्यांनी लाईफ ऑफ अ सिंगल मदर असं संबोधलं आहे. पुढं त्यांनी लिहिलं आहे, ‘मदरहूड अर्थात आईपण निभावणं हा सोपा जॉब नाही. तो स्वर्गीयही नाही. त्याचं उदात्तीकरण थांबवा.’
गीता यथार्थ यांनी सिंगल पॅरेंट असल्यानं काय काय गोष्टींना सामोरं जावं लागतं हे समजण्याच्या उद्देशानं हा फोटो शेअर केला होता. मात्र काही लोकांनी त्यांच्यावर टिका करायला सुरुवात केली. हा फोटो म्हणजे अश्लिलता असल्याचे या संस्कृती रक्षकांचे म्हणणे आहे. हे तर काय सगळेच करतात, पुरुषांनाही मूल सांभाळताना हे करावंच लागतं, यात असा सनसनाटी फोटो टाकण्याची काय गरज, अशा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.
टिकाकारांना उत्तर देताना गीता म्हणतात, पुरुष मूल तेव्हाच सांभाळतो जेव्हा स्त्री काही काळासाठी ते त्याच्याकडे सोपवते. महिलेसारखी त्याच्यावर ही जबाबदारी सर्वकाळ लादलेली नसते. आपण अजूनही मदरहूड हा शब्द पॅरेण्टहूड या शब्दानं रिप्लेस करू शकलेलो नाही. याबाबत कुणी बोलायला गेलं की आईपण महान असल्याचं सांगत तिला शांत बसवलं जातं. मार्ग कधीच काढले जात नाहीत. समानता आणण्याची गोष्ट केली जात नाही. याबाबत बोलण्यासाठी या फोटोला निमित्त म्हणून पाहणं अपेक्षित आहे.’
या सर्व गोष्टींमुळे ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
महत्वाच्या बातम्या –
निवडणुकीपूर्वी राज्यात खळबळ; ‘या’ नेत्यानं राजकारणाला ठोकला रामराम
पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; ‘या’ कारणामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गु.न्हा दाखल
‘इतक्या’ रुपयांनी महागलं सोनं, पाहा काय आहे आजचा भाव…
“ठाकरे सरकारमधील मंत्रीच बेशिस्त, ते इतरांना काय शिस्त लावणार”