मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या राजकारणात चांगलंच वादळ निर्माण केलं. त्यावरून आता आरोप प्रत्यारोपाला उधाण आलंय.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊतांच्या आरोपाला उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टीका केली.
उसनं आवसान कशासाठी आणता? तुमच्यात तो रग नाही. त्यासाठी रक्त लागतं. तुमच्यात भेसळ असल्याची घणाघाती टीका नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
संजय राऊतांकडं कोणतेही पुरावे नाहीत. त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हे सरकार जर जास्त भाजप कार्यकर्त्यांच्या मागे लागल्यास त्यांचे सर्व वाभाडे काढू आणि पळता भुई थोडी होईल, असा थेट इशारा देखील राणेंनी यावेळी दिलाय.
तुम्ही 56 आमदारांसह मांडीला मांडी लावून बसले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल. इतकी लाज कोणी आणली नाही, असा घणाघात नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
आपली कुवत काय? तुम्ही आलात कधी, शिवसेनेच्या जन्मानंतर 26 वर्षांनी आलात, असं राणे म्हणाले. शिवसेना भवनासाठी तुझे पाच पैसे तरी आहेत का? आम्ही एवढं केलं म्हणून आज शिवसेनेची सत्ता आहे, असं म्हणत राणेंनी जुन्या आठवणी ताज्या केल्या.
दरम्यान, राणेंनी केलेल्या टीकेला आता शिवसेनेने देखील प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला. तर संजय राऊतांनी देखील यावर उत्तर दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
“महाराष्ट्राच्या इतिहासात इतका लाचार मुख्यमंत्री झाला नसेल, इतकी लाज कुणी आणली नाही”
मॅक्सवेल IPLचे ‘हे’ सामने खेळणार नाही; कारण वाचून तुम्हालाही होईल आनंद
Bappi Lahiri | ‘या’ आजारामुळे बप्पी लाहिरी यांचं निधन झालं; तुम्हीही वेळीच काळजी घ्या
“संजय राऊतांना घाम का फुटला? त्यांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर”
अमोल कोल्हेंनी शब्द पाळला… घोडेस्वारी करत बैलजोडीसमोर बारी मारली!