मुंबई | अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटसृष्टीपासून बरीच लांब आहे. गेल्या काही वर्षांपासून ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. मलायका सध्या जरी चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील ती नेहमी रिअॅलीटी शोजमध्ये परिक्षक म्हणून दिसते.
मलायका सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती सोशल मीडिआच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांबरोबर अनेक कडू गोड गोष्टी शेेअर करत असते. सध्या मलायकाने अशीच एक भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहीली आहे. तिने ही पोस्ट आपला मुलगा अरहानसाठी शेेअर केली आहे.
मलायकाने यामध्ये तिचा आणि अरहानचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे दोघे मायलेक खिडकीतून बाहेर डोकावताना दिसत आहेत. फोटोमध्ये मलायकाने गाऊन तर अरहानने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट परिधान केल्याचं दिसत आहे.
हा फोटो शेअर करत मलायकाने लिहीलं आहे की, आम्ही दोघेही आता एका नवीन प्रवासाला निघालो आहोत. यामुळे एक अत्साह, अस्वस्थता आणि भिती आहे. मात्र, या प्रवासात अनेक नवीन अनुभव देखील येणार आहेत.
तसेच मला फक्त एवढं माहीत आहे की, मला अरहानचा अभिमान आहे. आता आपले पंख पसरवण्याची आणि स्वप्न जगण्याची वेळ आली आहे. मला आतापासूनच तुझी आठवण येत आहे, असं लिहीत मलायकाने या पोस्टमध्ये अरहान आपल्यापासून दूर जात असल्याने दु:ख व्यक्त केलं आहे.
मलायकाने अरहान जात असतानाचा मुंबई विमानतळावरील एक फोटो देखील सोशल मीडीयावर शेअर केला होता. या फोटोला तिने निरोप घेणे खूप कठीण आहे, असं कॅप्शन दिलं होतं. अरहान खान हा मलायका आणि अरबाज खान या दोघांचा मुलगा आहे.
अरहान पुढील शिक्षणासाठी बाहेर जात आहे. मुलगा पुढील शिक्षणासाठी बाहेर चालला असल्याने मलायका आणि अरबाज एकत्र पाहायला मिळाले होते. अरहान बाहेर जाण्याअगोदर सर्वांनी एकत्र जेवण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. यावेळी मलायकाचे आई वडील आणि अमृता अरोरा देखील उपस्थित होती.
महत्वाच्या बातम्या-
खूशी कपूरने आपल्या ‘या’ लूकने चाहत्यांना पाडली भुरळ, पाहा व्हायरल फोटो
‘कृपया तो व्हिडीओ शेअर करू नका’; जोडीदारासोबतचा खासगी MMS लीक होताच अभिनेत्री त्रस्त
लग्न मंडपातच नवरदेवाच्या आले नाकी नऊ, पाहा व्हायरल व्हिडीओ
वडिलांनी पोटच्या मुलाला उडवलं हवेत; त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ
मगरीसमोर शाईनिंग करायला गेली तरूणी अचानक मगरीनेच धरला हात अन्, पाहा व्हिडीओ