“शिवसैनिकांनो काळजी करू नका, हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही”

मुंबई | विधानपरिषद निकालानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. एकनाथ शिंदे 35 आमदारांसह नॉट रिचेबल झाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य धोक्यात आहे.

एकनाथ शिंदे भाजपाशासित राज्य असलेल्या गुजरातमध्ये पोहोचले. एकनाथ शिंदे यांचा मुक्काम सूरतमधल्या मेरिडेयन हॉटेलमध्ये असून त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आमदार उपस्थित आहेत. या घडामोडी पाहता सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत.

शिवसेनेत झालेल्या भूकंपानंतर सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा आहे. अनेकांकडून या राजकीय नाट्यावर प्रतिक्रिया दिल्या जात असून मीम्सचा पाऊसच पडला आहे. मात्र दुसरीकडे यातील एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

शरद पवारांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. याला शिवसैनिकांनो काळजी करू नका हा बाळासाहेबांचा जिगरी दोस्त अजून म्हातारा झाला नाही, असं कॅप्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनीही केलं होतं.

 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘त्या’ दिवशी नेमकं असं काय झालं की शिंदेंनी डायरेक्ट सूरत गाठलं?, खरं कारण आलं समोर 

‘या’ आमदारानं उद्धव ठाकरेंना आधीच अलर्ट दिला होता!, आता तोही आमदार या फोटोत 

सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण 

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का; ‘शिवसेने’वर एकनाथ शिंदेंचं वर्चस्व येणार? 

‘सामना’च्या अग्रलेखाची धार वाढली, पाहा नेमकं काय म्हटलंय…