Top news

माजंरीच्या पिल्लांना वाचवण्यासाठी चिमुलीची धडपड पाहून तुम्हीही व्हाल भावूक, पाहा व्हिडीओ

Photo Credit- facebook/Ganesh Pokale

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर लहान मुला-मुलींचे अनेक विनोदी, तर कधी-कधी सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

आपल्याला माहित असेल की, अनेकांना घरात मांजर, कुत्रा असे प्राणी पाळायला फार आवडतात. विशेष म्हणजे लहान मुलांना पाळीव प्राणी खूप आवडतात. अशातच एक लहान चिमुकलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलीची मांजरीच्या पिल्लांसाठी धडपड चालली असल्याचं समजतं आहे. ती त्या व्हिडीओमध्ये आपल्या वडिलांना त्यांबद्दल काहीतरी समजावून सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं आहे.

ती म्हणत आहे की, ‘मांजर तिच्या पिल्लांना का घेऊन जात नाही. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, त्यामुळे मी कुठे थांबले तर तुम्ही मला घेऊन जाल ना. पण ती मांजर आपल्या पिल्लांना घेऊन जात नाहीये. ते बघा तिचं पिल्लू कसं म्याँऊ, म्याँऊ करत आहे.’

तसेच हा व्हिडीओ गणेश पोकाळे यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी असं ‘शेवटच्या वाक्याला कळत ही तळमळ कुणासाठी चाललीये.’ कॅप्शनही दिलं आहे.

हा व्हिडीओतील त्या लहान मुलीला मांजरीच्या पिल्लाबद्दल वाटलेली तळमळ पाहून अनेकजण भावूक झाले आहेत. त्याचप्रमाणे या व्हिडीओला आतापर्यंत लोकांनी पाहिलं असून, अनेकांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या कमेंटही केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

हौसेनं गेली पोल डान्स करायला अन्…, पाहा व्हायरल…

‘मेरे रश्के कमर…’, तरूणाचा…

10 वर्षाच्या चिमुकलीचा ‘हा’ व्हिडीओ पाहून…

गाडी चालवताना अचानक समोर आला भलामोठा हत्ती अन्…, पाहा…

पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार…