उद्धव ठाकरेंनी का बरं राजीनामा द्यावा? तृप्ती देसाईंचा चंद्रकांत पाटलांना सवाल

मुंबई| मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे योग्य नाहीत. त्यांचा जन्म मुख्यमंत्रीपदासाठी झालेला नाही. ते वारसा चालवत आहेत. उद्धव ठाकरे हे अक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली होती.

त्यावरूनच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी भाजपवर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला देखील उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी स्थिर सरकार राज्याला दिलं आहे, हे तुम्हाला कबूल करावंच लागेल, असं देसाई यावेळी म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंनी का बरं राजीनामा द्यावा?, त्यांनी तर शेतकऱ्यांसाठी आल्यावर तातडीने लाखो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र महिला पोलिस स्टेशनची घोषणा केली. भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतल्यामुळच, आज उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि महाविकास आघाडीचे सरकार आलेलं आहे, असं तृप्ती देसाई बोलताना म्हणाल्या.

शिवसेना-भाजपमध्ये एक बैठक पार पडली असती तर संघर्ष झाला नसता, अशी खंत व्यक्त करत सगळं काही आलबेल झालं असतं, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-चिकन, मटन, मासे बिनधास्त खा आणि तंदुरस्त रहा; मुख्यमंत्र्यांची फेसबुक पोस्ट

-बुद्धीबळपटू विश्वनाथ आनंद कोरोनामुळे अडकला जर्मनीत

-मागची 5 वर्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते- चंद्रकांत पाटील

-“अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद स्टॅम्प पेपरवर लिहून द्या तरच चर्चेला या”

-“शरद पवारांनंतर आता अजित पवारांवर देखील पीएचडी करण्याची इच्छा”