सोलापुरात दोन अपक्ष… मामांचा ठाकरेंना पाठिंबा तर भाऊंची निष्ठा भाजपवर!

सोलापूर: राज्याच्या विधीमंडळात शनिवारी विश्वासदर्शक ठराव संमत झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोन अपक्ष आमदारांपैकी एक सरकारच्या बाजूने तर एका आमदाराने विरोधात राहणं पसंत केलं. यामध्ये उद्धव ठाकरे सरकारला यापूर्वीच दिलेल्या शब्दाप्रमाणे संजय शिंदे यांनी पाठिंबा दिला. तर बार्शीच्या राजाभाऊ राऊत यांनी भाजपवरील निष्ठा कायम ठेवली.

सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार वगळता काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला. यामध्येे करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनीही ठाकरे सरकारला पाठिंबा दिला.

खरं पाहिलं तर आमदार संजय शिंदे यांनी यापूर्वीच ज्या मुख्यमंत्र्यांचे सरकार येईल, त्याच सरकारला पाठिंबा असेल, असे जाहिर केले होते त्याप्रमाणे त्यांनी आपला पाठिंबा ठाकरे सरकारला दिला. त्यामुळे संजय शिंदे यांचा पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात शिरकाव झाल्याचे दिसून येते.

 बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मात्र देवेंद्र फडणवीस पर्यायाने भाजपवरच आपली निष्ठा कायम ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्ह्यात भाजपच्या वर्तुळात सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते यांच्यासोबत आगामी काळात राजाभाऊ राऊतदेखील दिसून येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-