“डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते, आता लवकरच…”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारविरोधात (MVA Government) सातत्यानं आवाज उठवणारे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी ईडीकडे (ED) तक्रार दाखल केली आहे. जरंडेश्वर कारखाना व्यवहार प्रकरणी सोमय्या आक्रमक झाले आहेत.

गेल्या वर्षभरापासून सोमय्या यांनी सातत्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांशी संबंधित कंपन्यांवर कारवाईसाठी ईडीच्या कार्यालयात धाव घेतली आहे.

ईडी राज्यात कारवाईचा वेग वाढवत असताना आता परत एकदा सोमय्यांनी पवारांवर टीका केली आहे. जरंडेश्वर कारखाना जप्त करण्यात आला आहे, असंही सोमय्या म्हणाले आहेत.

बेनामी संपत्ती जप्त होताना डझनभर पवार लाईनमध्ये उभं राहून रडत होते, अशी जहरी टीकाही सोमय्यांनी केली आहे. परिणामी राज्यात वाद वाढणार आहे.

जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या कारभार हातात आहे, अजूनही अजित पवारांची बेनामी संपत्ती प्रकरणात चौकशी चालू आहे, असं सोमय्या म्हणाले आहेत.

दोन दिवसात परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी कारवाईला सुरूवात झाली आहे. लवकरच ठाकरे सरकारचे मंत्री जेलमध्ये जाणार आहेत, असा इशारा देखील सोमय्यांनी दिला आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात जोरदार वाद चालू आहे. काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वकीलांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 उद्धव ठाकरे राष्ट्रवादीवर नाराज, शरद पवारांकडे केली तक्रार?

Sharad Pawar | “शरद पवार एक भीष्म पितामह आहेत” 

“ईडीचा वापर पाळलेल्या गुंडासारखा जर कोणी करत असेल तर…” 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय! 

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा