नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका केली. या टीकेनंतर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्रास देण्यात येत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत आहे, अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आता सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्यावर सोमय्या यांनी जोरदार टीका केली आहे. परिणामी आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
रश्मी ठाकरे यांनी अलिबागमधील 19 बंगल्याचा टॅक्स भरला आहे. तसेच शिवसेने नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनीही या बंगल्यांचा टॅक्स भरला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी बंगल्यांचा टॅक्स भरला नाही असं लिहून द्यावं, असं आव्हानही किरीट सोमय्या यांनी ठाकरेंना दिलं आहे. परिणामी भाजप आणि शिवसेनेतील वाद वाढला आहे.
रश्मी ठाकरेंवर केलेले आरोप जर खोटे असतील तर मला माझ्याच जोड्यांनी मारा, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तर आता संजय राऊत कुणाला जोड्यानंं मारायला हवं, असा सवाल त्यांनी किरीट राऊतांना केल आहे.
रश्मी ठाकरेंनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला आहे त्यानंतर ती घरे चोरीला गेली का?, असा सवाल किरीट सोमय्यांनी शिवसेनेला विचारला आहे. सोमय्यांच्या प्रत्यूत्तरानंतर राज्यात मोठा वाद सुर आहे.
दरम्यान, रश्मी ठाकरे यांचं नाव या प्रकरणात आल्यानं आता शिवसेना काय भूमिका घेते याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि भाजपमधील हा सत्तासंघर्ष असाच चालू राहाण्याचे संकेत दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Bappi Lahiri | ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन!
काळजी घ्या! कोरोनाबाधित रुग्णांवर केलेल्या संशोधनातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू
“संजय राऊतांवर 420 चा गुन्हा दाखल करा, त्यांनी आम्हाला फसवलंय”
युक्रेन-रशिया संघर्ष टोकाला! हल्ला होण्याची भीती असताना रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा