“मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट, दारू प्यायलो नाही; अंडही खाल्लं नाही पण…”

मुंबई | राज्यासह देशाच्या राजकारणात सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार वाद रंगला आहे. संसदेत मोदींच्या भाषणानंतर देशभर भाजपविरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. तर राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होत आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या सध्या चर्चेत आहेत. सोमय्या यांनी गतकाही महिन्यापासून महाविकास आघाडीला घेरलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले होते. सोमय्या हे पुणे महापालिकेत शिवसेनेशी निगडीत काही भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड करण्यासाठी आले असता मोठा गोंधळ घडला होता.

किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिका परिसरात काही शिवसैनिकांनी हल्ला केल्यानं राज्यभरात तणाव निर्माण झाला होता. किरीट सोमय्या हे महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले होते.

सोमय्या पडल्यानंतर त्यांना तात्काळ संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर मात्र भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात आली होती. शिवसेनेनं सोमय्या यांना मारण्याचा इरादा केल्याचा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

सोमय्या यांनी आता पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मी आयुष्यात कधी विडी, सिगारेट, दारू प्यायलो नाही, अंड देखील खाल्लं नाही. मला कसल्याही प्रकारचं व्यसन नाही, असं सोमय्या म्हणाले आहेत.

मी कसलंही व्यसन करत नाही पण माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा आहे, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे. परिणामी आता हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोमय्या यांच्या या टीकेनंतर आता महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. सोमय्या यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “10 मार्चनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार…”

 “माझ्यात ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची नशा”

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे, इथे दादागिरी चालणार नाही” 

“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही” 

‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी….’; संजय राऊतांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट