Top news आरोग्य देश

बिहारच्या गरजू मुलींना सॅनिटरी पॅड मिळावं म्हणून युवतींनी मिळून केलं ‘हे’ काम

नवी दिल्ली | देशातील शहरी भागात मुली आपल्या आरोग्याबाबत जागृत असतात. शहरात तेवढ्या सुविधा उपलब्ध असतात. मात्र, ग्रामीण भागात तेवढ्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मुली आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

आता तुम्हाला ग्रामीण भागातील काही युवा मुलींविषयी सांगणार आहोत ज्यांनी बाकीच्यांची गरज ओळखून त्यांच्या मदतीसाठी एक पाऊल टाकले आहे. बिहारमधील नवादा जिल्ह्यातील युवा मुलींनी बाकीच्या मुलींची मासिक पाळीची गरज लक्षात घेऊन त्यांना मदत केली आहे.

या युवा मुलींनी मिळून एक सॅनिटरी पॅडची बँकच खोलली आहे. प्रत्येकाच्या इच्छेनुसार दररोज दिलेला एक रुपया बिहारच्या गरजू मुलींसाठी खूपच मोठी मदत ठरत आहे. प्रत्येक दिवशी इथे एक मुलगी येऊन एक रुपये जमा करते.

जमा केलेल्या एक रुपयाचा उपयोग ते सॅनिटरी पॅडची खरेदी करण्यासाठी करतात. काही मुलींच्या एक गोष्ट लक्षात आली की, पैसे नसल्यामुळे काही मुली सॅनिटरी पॅडची खरेदी करू शकत नाही, त्यामुळे त्यांनी असा उपक्रम चालवायचं ठरवलं.

हा पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडिया यांनी सुरू केलेला एक ट्रान्स मीडिया एज्युटेंन्मेंट उपक्रम आहे. यामध्ये कुटुंब नियोजन, बाल-विवाह, घरगुती हिंसाचार, किशोर वयातील पुनरुत्पादन आणि लै.गिंक आरोग्याची समस्या या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते.

अमावा गावातील युवा नेत्या अनु कुमारी म्हणाल्या की, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी आम्ही रोज एक रुपया जमा करतो. याचाच अर्थ प्रत्येक मुलगी एका महिन्यात ३० रुपये देते. आम्ही सॅनिटरी पॅडची खरेदी करतो आणि गरजू मुलींमध्ये त्याचे वितरण करतो.

नवादा जिल्ह्यातील माजी सिव्हिल सर्जन डॉ. श्रीनाथ प्रसाद म्हणाले की, मुली पहिल्या स्वतःसाठी बोलायला लाजत होत्या. मुलींना आपल्या शरीरात होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी माहित नव्हते.

तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, त्यांना सॅनिटरी पॅडविषयी माहित नव्हते. पण आज सॅनिटरी पॅडची बँकच सुरू झाली आहे. या अतिशय साध्या आणि सोप्या उपक्रमामुळे अनेक मुलींचे जीवन बदलू शकेल यासाठी फक्त आपण एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल मधील धोनीचा ‘तो’ विक्रम मोडीत काढत विराटनं रचला नवा इतिहास

उपमुख्यमंत्री अजित पवार ‘त्या’ प्रकरणी अडकणार? ईडीची मोठी कारवाई

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुहूर्तावर सोडलं मौन म्हणाले…

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण