…म्हणून सोनाक्षी सिन्हाला सोशल मीडियावर केलं ट्रोल

मुंबई : लहानपणापासून आपल्याला काही गोष्टी शिकवल्या जातात. किंवा आपण, ज्या वर्तुळात वावरतो त्या माध्यमातून या गोष्टी ओघाओघाने आपल्याला उमगतात. याच गोष्टी मनावर अशा काही बिंबवल्या जातात ज्याचा विसर आपल्याला पडत नाही. असं असलं तरीही एक बी टाऊन अभिनेत्रीला मात्र एका महत्त्वाच्या गोष्टीचाच विसर पडला आहे.

साऱ्या देशासमोर एका सोप्या प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकलेली नाही. ज्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. कित्येकांनी तर तिची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे.

रामायण नावाच्याच बंगल्यात राहणाऱ्या या अभिनेत्रीला रामायणाशीच संबंधीत एक सोपा प्रश्न विचारण्यात आला, ज्याचं उत्तर काही तिला देता आलेलं नाही. ही तर दुसरी आलिया, असं म्हणत खिल्ली उडवली जाणारी अभिनेत्री आहे, शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमादरम्यान राजस्थानच्या बाडमेर येथील रुमा देवी यांच्यासह सोनाक्षी या खेळात सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यानच रुमा देवी आणि सोनाक्षीला एक प्रश्न विचारण्यात आला. रामायणानुसार हनुमान कोणासाठी संजीवनी घेऊन गेले होते? हाच तो प्रश्न.

 

महत्वाच्या बातम्या-