मुंबई | अभिनेत्री अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने आपल्या चाहत्यांना तिच्या वाढदिवसाला एक गोड गिफ्ट दिलं आहे. तिने आपला स्वत:चा साखरपुडा (एंगेजमेंट) झाल्याचं आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून जाहीर केलं आहे.
उद्योगपती कुणाल बोनोडेकर याच्याशी तिचा साखरपुडा झाल्याचं सांगितलं आहे. घरातल्या सगळ्या लोकांशी उपस्थित हा सोहळा दुबाईमध्ये पार पडला. फेब्रुवारी महिन्यात तिने एक फोटो शेअर करत एका नव्या आयुष्याला सुरूवात करतीये, असं म्हटलं होतं. त्याचसोबत त्या फोटोमध्ये कुणालला देखील तिने टॅग केलं होतं. तेव्हापासून ती कुणालबरोबर लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
2 फेब्रुवारी 2020 रोजी हा साखरपुडा पार पडला. मात्र आपल्या वाढदिवशी सोनालीने ही शुभ वार्ता आपल्या चाहत्यांना तसंच महाराष्ट्राला दिली आहे. पेशाने उद्योगपती असलेल्या कुणालशी तिने आता उर्वरित आयुष्य घालवण्याचं ठरवलं आहे.
सोनाली आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हणते, “आमचा 02. 02. 2020 ला साखरपुडा झाला… आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्या पेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…!!!”
Before my birthday ends
I want to mark it by making a SPECIAL ANNOUNCEMENT
Introducing my fiancé @Keno_Beno
आमचा ०२.०२.२०२० ला साखरपुडा झाला
आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच
शकत नाही असं मला वाटतं
आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या pic.twitter.com/Oj9hSWdS99— Sonalee (@meSonalee) May 18, 2020
महत्वाच्या बातम्या-
-मोदीजी, शेतकरी जगला पाहिजे…. शेतकऱ्याला वाचवा; पवारांची पत्रातून आर्त साद
-दिलदार रिक्षावाला! लग्नासाठी जमवलेली रक्कम मजूरांच्या जेवणासाठी करतोय खर्च
-हे आघाडीचं सरकार आहे की वाधवान सरकार??; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
-माझं ट्विट नीट पाहा, मंदिराचं सोनं घ्या असं म्हटलंच नाही- पृथ्वीराज चव्हाण
-अतिशहाणपणा केल्यानेच मला कोरोना झाला- जितेंद्र आव्हाड