देश

तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा- सोनिया गांधी

नवी दिल्ली | तिजोरी उघडा आणि गरजूंना तात्काळ मदत करा. गरजू कुटुंबांना सहा महिन्यांसाठी दरमहा 7 हजार 500 रुपये रोख रकमेच्या स्वरुपात द्या, अशी मागणी  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.

लाखो मजुरांना औषध-पाण्याविना शेकडो-हजारो किलोमीटर अंतर अनवाणी आणि उपाशीपोटी पार करावे लागले, हे पाहून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच प्रत्येकाला इतक्या वेदना झाल्या. त्यांची तळमळ, त्यांचे दु:ख, त्यांचे हुंदके देशातील प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचले, पण कदाचित सरकारला ऐकू गेले नाही, असं म्हणत सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, लाखो व्यवसाय बुडाले, कारखाने बंद पडले, शेतकऱ्यांना धान्य विकायला उंबरे झिजवावे लागले. संपूर्ण देशाला त्रास सहन करावा लागला, पण कदाचित सरकारला याची जाणीव झाली नाही, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

जोरीचे कुलूप उघडून गरजूंना दिलासा द्यावा, असा आग्रह आम्ही पुन्हा केंद्र सरकारला करतो. प्रत्येक गरजू कुटुंबाला सहा महिन्यांसाठी दरमहा 7,500 रुपये रोख द्यावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पृथ्वीराज चव्हाण यांचं हे आव्हान देवेंद्र फडणवीस स्वीकारतील का?

-…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

-‘या’ माजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट करत 43 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीला रामराम

-काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना रिंगणात तर बाबांच्या हाती छडी!

-मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही- उद्धव ठाकरे