नवी दिल्ली | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी रूग्णालयात उपचार घेत होत्या.
सोनिया गांधी यांनी कोरोनावर मात केली असून अखेर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 8 दिवसांनंतर सोनिया गांधी कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी लवकरच ईडीच्या चौकशीला हजेरी लावू शकतात.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात 23 जून रोजी सोनिया गांधींची ईडी चौकशी होऊ शकते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना समन्स जारी केले असून 23 जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी 8 जून रोजी देखील ईडीने सोनिया गांधी यांना चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सोनिया गांधींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने ईडीला दुसरी तारीख जारी करावी लागली.
सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांनतर 12 जूनला त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
दरम्यान, सोनिया गांधी यांना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांना आता ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर मतमोजणीला सुरूवात, थोड्याच वेळात निकाल समोर येणार
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
मोठी बातमी! काँग्रेसचा आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळला
भाजपच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप, अशोक चव्हाण म्हणतात…
“महाविकास आघाडी सरकारच्या अहंकाराचा या निवडणुकीत पराभव होणार”