नवी दिल्ली | भाजप आणि काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये पाच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे.
काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लोकसभेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियाच्या वापरावर गांधींनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
फेसबुक आणि ट्विटरचा गैरवापर करून सरकार देशातील नागरिकांना लक्ष्य करत आहे. सरकार सोशल मीडियाचा गैरवापर करत आहे, अशी टीका सोनिया गांधींनी केली आहे.
फेसबुकशी सत्ताधाऱ्यांचं असेलेलं साटेलोट जगातील सर्वात शक्तीशाली लोकशाहीसाठी मारक असल्याचं सोनिया गांधी म्हणल्या आहेत.
फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सामाजिक स्थैर्य भंग केलं जात आहे. आपल्या लोकशाहीसाठी हा धोका असल्याचं मत गांधींनी व्यक्त केलं आहे.
फेसबुक आणि ट्विटरद्वारे काही राजकीय नेते आणि राजकीय पक्ष राजकीय नरेटिव्ह तयार करत आहेत. सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळत नसल्याचं लक्षात येत आहे, असंही गांधी म्हणाल्या आहेत.
लोकसभेत सोनिया गांधींनी सोशल मीडियाचं स्वातंत्र्य आणि गैरवापर यावर भाष्य केलं आहे. सोनिया गांधींनी मोदी सरकारवर लोकसभेत जोरदार टीका केली.
दरम्यान, सोनिया गांधींनी लोकसभेत मीडियाच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काॅंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“…तर काँग्रेस भाजपला 2024 मध्ये तगडं आव्हान देऊ शकतं”
“नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान पद सोडतील आणि…”
Corona Virus | चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, धडकी भरवणारी बातमी समोर
चंद्रकांत पाटलांचा नवा खळबळजनक दावा; राजकारणात मोठी उलथापालथ होणार?
Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे आता फक्त 14 दिवसांचा…