‘राजस्थानातील 90 आमदारांच्या बंडावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा मोठा निर्णय’

जयपूर | काँग्रेस (INC) पक्षात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. एकीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) कन्याकुमारी ते काश्मारी (Kanyakumari to Kashmir) या 3570 किमी पदयात्रेत ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) अभियानात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षांच्या निवडीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यात लढत होणार आहे.

पण राजस्थानात काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामे तयार केले आहेत. अशोक गेहलोत यांच्या पश्चात मुख्यमंत्री पदाची धुरा आमदार सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्या हातात देण्याचा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे.

याला राजस्थानातील काँग्रेसच्या आमदारांचा आणि नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी राजीनाम्याचे शस्त्र काढले आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गांधी यांनी महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा केल्या. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकासाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवाय त्यांनी दिल्लीतून राजस्थानची परिस्थिती पाहण्यासाठी विशेष निरीक्षक पथक पाठविले आहे. हे लोक सर्व आमदारांसोबत चर्चा करुन अहवाल सादर करणार आहेत.

गेहलोत गेल्यावर त्यांची जागा सचिन पायलट घेणार होते. त्याला विरोध म्हणून गेहलोत समर्थक आमदारांनी पक्षाला राजीनाम्याची धमकी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये राजकीय संकंट निर्माण झाले आहे.

या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी दिल्लीतून ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharage) आणि अजय माकन (Ajay Makan) यांची राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

“गुजरातचा सिंह महाराष्ट्रात येणार आणि महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार” – सुंधीर मुनगंटीवार

“… म्हणून त्यांच्यावर पक्षांतरविरोधी कारवाईचा आरोप नक्की करावा”; सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

“उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे”; भाजप नेत्याची मोठी टीका

रायगडावरील पिंडदानाचे हिंदुत्वादी संघटनाकडून समर्थन; म्हणाले, “संभाजी ब्रिग्रेडचा आरोप…”

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर उज्वल निकम यांचे भाष्य; न्यायालयाकडे प्रामुख्याने तीन प्रश्न आहेत ते म्हणजे…