मुंबई | प्रसिद्ध गायक सोनू निगम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 2017 मध्ये सोनू निगमने अजानला विरोध केला होता. सोनू निगमच्या ट्विटनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता पुन्हा एकदा सोनू निगमने नवरात्री आणि मटणबंदीवर वक्तव्य केलं आहे. सोनू निगमच्या वक्तव्यावर सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जात आहे.
जर नवरात्री सुरू असेल तर आपण मटणाची दुकाने बंद करा, असं बोलतात. आता मी दुबईमध्ये राहतो. एक इस्लामिक देश आहे. खुप चांगला देश आहे, असं सोनू निगम म्हणाला आहे.
मी कोणताही भक्त नाही की, ज्याने जय श्रीराम बोलावे. नवरात्रीमध्ये मांसाहारावर बंदी का आणावी?, एखाद्या माणसाचा शॉप असेल, जर त्याचे पोट त्यावर असेल तर मग त्याचे दुकान बंद करणार का?, असा प्रश्न सोनू निगमने केला आहे.
सोशल मीडियावर सोनू निगमच्या वक्तव्यावर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोनू निगमच्या नवरात्रीमध्ये मटण बंद करण्याच्या आणि जय श्री राम संदर्भातील वक्तव्यावरून लोक टीका करत आहेत.
सोनू निगमने अजानवरून देखील वक्तव्य केलं होतं. मात्र, आता बोलताना सोनूने पलटी मारली आहे. 2017 मध्ये अजानच्या आवाजाला सोनू निगमने विरोध केला होता.
अजानचे वक्तव्य केल्यानंतर वादात सापडल्याचे पाहुन सोनू निगमने स्पष्टीकरण देखील दिले होते. आपण एक सामाजिक मुद्दा उठवलेला आहे, असं सोनू निगमने म्हटलं होतं.
मी एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहे, असं सोनू निगमने स्पष्ट केलं होतं. मी अजानच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही तर तीव्र आवाजाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे, असं सोनू निगम म्हणाला होता.
दरम्यान, मी जर पाकिस्तानी गायक असतो तर खुप चांगले झाले असते. गाण्यासाठी भारतीय गायकांकडून पैसे घेतले जातात, असंही सोनू निगम म्हणाला आहे.
पाहा व्हिडीओ-
We will not admitted this type of
Answer secular people always do@AmitShahOffice @HMOIndia @AmitShah @NIA_India#BhandSonuNigampic.twitter.com/TrMaxRp6yV— Rani Singh (@RaniSingh7459) May 18, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
‘जनतेचे मुख्य प्रश्न टाळण्यासाठीच राज ठाकरे…’; नाना पटोलेंचा प्रहार
‘नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनियम सुरू’; राष्ट्रवादीचा मनसेला जोरदार टोला
मोठी बातमी ! राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर
मोठी बातमी! काॅंग्रेसचा शिवसेनेवर तब्बल 24 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
आयपीएलचा रोमांच! RCB च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत पण…