देश मनोरंजन

‘आयएएस’च्या स्वप्नाआड पैशांची आली अडचण, तिथंही धावून आला सोनू सूद!

मुंबई | देशात अनेक जण भारतीय नागरी सेवा म्हणजेच आयएएसची परिक्षेची तयारी करत असतात. शहराच्या अनेक ठिकाणी याचे प्रशिक्षण वर्ग असतात. पण ग्रामीण भागात याचे प्रमाण खूपच कमी आहे. शहरात विद्यार्थी प्रशिक्षण वर्गद्वारे आयएएसची परिक्षेची तयारी करतात.

पण सहसा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढे पैसे देऊन आयएएसची परिक्षेची तयारी करता येत नाही. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची इच्छाशक्ती तीव्र असल्यामुळे त्यांना यासाठी मदत मिळते. असाच एक प्रसंग नुकताच समोर आला आहे.

नुकतेच ट्विटरवर एका युजरने अभिनेता सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली आहे. या युजरने आपल्या शिक्षणासाठी सोनू सूद यांच्याकडे फीसाठी पैशांची मागणी केली आहे.

या युजरने सोनू सूद यांना टॅग करून ट्विटमध्ये करून लिहिले,”सर मी माझ्या वर्गातील टॉपर आहे. मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे. पण पैशांच्या अडचणीमुळे मी फी जमा करू शकत नाही.” त्या युजरने पुरावा म्हणून ट्विटमध्ये काही कागदपत्र जोडली आहे.

सोनू सूद यांनी जास्त वेळ न घेता त्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत पोहोचवली आहे. सोनू सूद यांनी सर्व फी जमा केली आहे. सोनू सूद यांनी या विद्यार्थ्याला आयएएस अधिकारी बनण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे. खलनायकाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सोनू सूद यांची टाळेबंदीपासून असलेली मुख्य नायकाची भूमिका लोकांच्या विशेष पसंतीस पडली आहे.

देशात टाळेबंदी लागू झाली. अनेक प्रवासी मजूर चालत घरी जात होते, ही गोष्ट सोनू सूद यांच्या मनाला लागली. तेव्हापासून सोनू सूद यांनी मदतीला सुरवात केली आहे. देशातील आणि परदेशातील गरजूंना त्यांनी मदत केली. प्रवासी मजूरांपासून सोनू सूद यांनी मदतीला सुरवात केली. त्यावेळी सर्व वाहतूक सेवा बंद होती, त्यामुळे प्रवासी मजूर चालत त्यांच्या घरी जात होते.

तेव्हा सोनू सूद यांनी वाहतूक सेवेची व्यवस्था करून त्या सर्व मजुरांना सुखरूप घरी पोहोचवले. त्यानंतर सोनू सूद यांना ट्विटरवर रोज हजारो मेसेज मदतीसाठी येऊ लागले. त्यातील प्रत्येक गरजूला सोनू सूद यांनी मदत केली. सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे, पण काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हते, त्यांच्यासाठी सोनू सूद यांनी मोबाईलची व्यवस्था केली.

सोनू सूद यांनी केलेल्या या मदतीमुळे आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना नुकताच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (युएनडीपी) यांच्या प्रतिष्ठित एसडीजी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स) स्पेशल ह्युमनटॅरिअन पुरस्काराने सन्मानित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा रेकॉर्ड, विराट कोहलीलाही टाकलं मागे!

अंकिता लोखंडेनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, सुशांतच्या चाहत्यांनी केलं जोरदार ट्रोल

बिग बॉसच्या सर्वात महागड्या स्पर्धकांमध्ये राधे माँ; रक्कम ऐकून डोळे पांढरे होतील!

करण जोहरसह डझनभर कलाकारांचं टेंशन वाढलं, ‘या’ प्रकरणात नव्याने होणार चौकशी?

भारताचा ‘हा’ युवा खेळाडू तळपला; विराट-रोहितचा तुफानी फिफ्टीचा रेकॉर्ड तोडला