मुंबई | शिवसेना आणि सोनू सूद यांच्यात काल दिवसभर चांगलाच कलगीतुरा रंगला होता. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी रोखठोकच्या माध्यमातून सोनू सूदवर जोरदार टीकेचे बाण सोडले. त्यानंतर काल रात्री उशिरा सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर सोनूने चक्क मराठीमध्ये ट्विट केलं.
स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं आहे, असं ट्विट सोनूने केलं आहे.
सोनू सूदच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी देखील भेटीचा तपशील सांगणारं ट्विट केलं आहे. अभिनेता सोनू सूदने मातोश्रीवर येऊन माझी भेट घेतली. या भेटीत त्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल चर्चा केली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तत्पूर्वी रविवारी संजय राऊत यांनी सोनूला चांगलंच झोडपून काढलं. एकट्या माणसाला एवढं सगळं मदतकार्य कसं करता येतं यावर शिवसेनेने सवाल उपस्थित करत सोनू भाजपचा स्पॉन्सर आहे, असा आरोप केला. त्याच्या दिमतीला कोणती यंत्रणा आहे हे आम्हाला ठाऊक आहे, असंं म्हणत त्यांनी भाजपकडे बोट दाखवलं. या सगळ्या वादामुळेच सोनूने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं.
— sonu sood (@SonuSood) June 7, 2020
महत्वाच्या बातम्या-
लक्षणं नसलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना आता ‘हा’ पर्याय, सरकारची महत्त्वाची माहिती
-पुण्यात आज 259 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा नव्याने किती रूग्ण वाढले…
-भवानी पेठेने कोरोनाला हरवलं… पुण्यात रूग्णसंख्येत दहाव्या क्रमांकावर
-दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का?; गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…