मुंबई| गेल्या अनेक महिन्यांपासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती सोशल मीडियापासून दूर आहे. सुशांत आत्मह.त्या प्रकरणात तिला तु.रूंगवास देखील झाला. या सर्व प्रकरणामुळे ती बॉलिवूड विश्वात चर्चेचा विषय ठरली होती. यासर्व घटनेनंतर सोशल मीडियापासून दूर असलेल्या रिया चक्रवर्तीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्मह.त्येनंतर रिया चक्रवर्ती कधी नव्हे इतकी चर्चेत आली होती. तब्बल सहा महिन्यानंतर रिया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेली पाहून प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. रियाच्या पोस्टवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी तिला ट्रोल केले. पण काही मात्र रियाची माफी मागताना दिसले.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अडकल्यापासून रिया सोशल मीडिया वरुन गायब झाली होती. मात्र महिला दिन दिवशी रियाने तब्बल 6 महिन्यांनंतर तीच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये तीने तीच्या आईचा हात पकडल्याचं दिसत आहे. या फोटोला रियाने आम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा, आई आणि मी, कायम एकत्र, माझी ताकद, माझा विश्वास, माझं मनोबल, माझी आई, असं कॅप्शन देखील दिलं आहे.
या फोटोवर शेकडो कमेेंट्स आलेल्या पहायला मिळाल्या. एका नेटकऱ्यानं पोस्टवर कमेंट करत रियाची माफी मागितली. देशाच्या मीडियाने तुझा खूप छळ केला आहे. पण तू फायटर आहेस आणि नेहमी राहणार, असं म्हणत युजरने रियाची माफी मागितली आहे.
अनेक लोकांनी रियाची मागितली. तर काहींनी तिला परत ट्रोलही केलं.
दरम्यान, बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून 2020 ला त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मात्र त्याची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याची प्रेयसी बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केल्याचा आरोप तीच्यावर केला गेला. तसेच ड्रग्सप्रकरणी रियाला अटक देखील करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ अभिनेञीनं बाथटबमधे केलं बो.ल्ड फोटोशूट; सोशल मीडियावर फोटोंचा धुरळा, पाहा फोटो
मोठी बातमी! मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
जसप्रीत बुमरा होणार पुण्याचा जावई; पाहा कोण आहे त्याची होणारी बायको!
चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी करा ‘या’ गोष्टीचे सेवन
स्त्री होण्यासाठी पुरुष करतायेत लिंग बदल; ‘या’ शहरात लिंग परिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड