खेळ

‘या’ क्रिकेटपटूचं धोनीच्या भवितव्याबद्दल मोठं वक्तव्य!

Ms dhoni

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्य काय असले याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

धोनीसारख्या खेळाडूबाबत निर्णय घेताना काही गोष्टी बंद दाराआड चर्चा कराव्या लागतात. याबाबत जाहीर निर्णय घेतला जाऊ शकत नाही. धोनीबाबत सर्व सदस्यांमध्ये एकवाक्यता आहे, असं गांगुली म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.

धोनी आगामी आयपीएलमध्ये कसा खेळ करतो यावर खूप काही अवलंबून असणार आहे. त्याच्या आयपीएलमधील खेळावरच त्याचं भवितव्य ठरणार आहे, असं वक्तव्य भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यापूर्वी केलं होतं.

दरम्यान, धोनीच्या अनुपस्थित निवड समितीने ऋषभ पंतला संघात स्थान दिले होते. मात्र, पंत सतत अपयशी ठरत आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनीला परत संघात घेण्याची मागणी होऊ लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-