लेकीच्या ‘त्या’ पोस्टबाबत गांगुलीनं केला खुलासा!

कोलकाता | नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ‘जामिया’च्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचं प्रकरण देशभरात चर्चेत आहे. अशातच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना हिची एक इंस्टाग्राम पोस्टही चर्चेत होती. मात्र ती व्हायरल पोस्ट खोटी असल्याचं, सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.

ती पोस्ट खोटी आहे…राजकारणाविषयी समजण्यासाठी सना अजून खूप लहान आहे…कृपया सनाला अशा मुद्द्यांपासून दूर ठेवा, असं आवाहन सौरव गांगुलीनं केलं आहे. सौरव गांगुलीनं यावर ट्विटरद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे.

आपल्यापैकी ज्यांना वाटतंय की ते मुस्लिम नाहीत त्यामुळे सुरक्षित आहेत. ते मुर्खांच्या जगात जगतायेत, अशा आशयाची पोस्ट सनानं केली होती. सनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ती पोस्ट दिसत नाहीये. पण सोशल मीडियावर पोस्टचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळं सोशल मीडियावर अनेक बाॅलिवूड कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यात जोरदार ट्विटरवार झाले. तर काहींनी सरकारच्या समर्थनार्थ पोस्ट शेयर केल्या होत्या.

 

 

महत्वाच्या बातम्या-