दर्यादिल दादा… लॉकडाऊन काळात 10 हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली

मुंबई | बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने खडतर काळात पुन्हा एकदा आपलं सामाजिक भान राखलं आहे. कोलकात्याच्या इस्कॉन केंद्राला सौरव गांगुली लॉकडाऊन काळात अन्नदानासाठी मदत करणार आहे.

सध्याचा काळ खडतर आहे, आम्ही दररोज 10 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत होतो. सौरवने आमच्या केंद्राला भेट देऊन अन्नदानासाठी जी काही मदत लागेल ते पुरवण्याचं आश्वासन दिलंय. यामुळे आम्ही आता दररोज 20 हजार लोकांना जेवणं पुरवू शकतो, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

सौरव गांगुलीने दहा हजार लोकांच्या जेवणाची जबाबदारी स्विकारली आहे. इस्कॉनच्या कोलकाता केंद्रात दररोज 10 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते, सौरव गांगुलीच्या मदतकार्यानंतर आता याच केंद्रात 20 हजार लोकांना रोजचं जेवण मिळणार आहे.

दरम्यान, याआधी सौरव गांगुलीने बेलूर मठाला मोठ्या प्रमाणात तांदूळ दान केलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

-विराट कोहली अन् रो’हिट’ शर्माचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा; केलं हे आवाहन

-पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर

-‘कोरोना’काळातही काका-पुतण्यांमध्ये जुंपली; होम क्वारंटाइन करण्याच्या मागणीवर जयदत्त क्षीरसागर म्हणाले…

-मोदींनी केलेल्या आवाहनानुसार आज सर्वांनी वीज घालवली तर अडचण येईल का?; फडणवीस म्हणाले…

-उद्धव ठाकरे सरकारचे निर्णय अपुरे, मंत्र्यांमध्ये समन्वय नाही- देवेंद्र फडणवीस