ऋषभ पंतमध्ये धोनीसारखा दम नाही; माजी क्रिकेटपटूचं खळबळजनक वक्तव्य!

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं दक्षिण आफ्रिकेविरोधात निवडलेल्या भारतीय संघावर समाधान व्यक्त केले आहे. टी-20 सामन्यात महेंद्रसिंग धोनीला संघात जागा न घेण्याबाबतही गांगुलीनं यावेळी समर्थन केले. तसेच, ऋषभ पंतची निवड योग्य असल्याचेही गागूली म्हणाला.

ऋषभ पंत हा महेंद्रसिंह धोनीसारखा नाही आहे, किंवा येत्या तीन-चार वर्षातही असे होणार नाहीत. धोनीला एमएस धोनी होण्यासाठी तब्बल 15 वर्षांचा कालावधी लागला. भारतीय संघासाठी पंत खास आहे”, असं मत व्यक्त करत गांगुलीनं पंतची तुलना धोनीसोबत केली आहे. 

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आपल्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरोधात भिडणार आहे. 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान या दौऱ्यासाठी 29 ऑगस्ट रोजी भारतीय संघाची निवड करण्यात आली.

तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यात महेंद्रसिंग धोनी, जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच, वेस्ट इंडिज दौऱ्यात विश्रांती देण्यात आलेल्या हार्दिक पांड्याला संघात स्थान दिलं आहे. यावेळी गांगुलीनं संघ निवडीवर भाष्य केले.

मला नव्हते वाटतं की दक्षिण आफ्रिकेविरोधात धोनीची निवड झाली असती. वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 मालिकेतच संकेत मिळाले होते की पंतला संघात जागा मिळायला हवी. कारण जेव्हा धोनी युवा खेळाडू होता, तेव्हा त्याला संधी देण्यात आली होती, असं मत सौरभ गांगूलीने एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-