साउथ स्टार धनुषने केली घटस्फोटाची घोषणा; 18 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय

चेन्नई | अभिनेता धनुषने सोशल मीडिया अकाऊंटवरून पत्नी ऐश्वर्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षानंतर हे दोघेही वेगळे होत आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे.

धनुष आणि ऐश्वर्याने वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द धनुषने याबद्दल ट्वीट करून आम्ही वेगळ होत असल्याचं जाहीर केलं आहे. धनुषने अचानक पोस्ट करून ही घोषणा केल्याने त्याच्या फॅन्सला मोठा धक्का बसला आहे.

धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. 18 वर्षाची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता, असं धनुषने म्हटलंय.

आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.

धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्याबरोबर 18 नोव्हेंबर 2004 मध्ये झाले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती.त्यांच्या लग्नात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती.

लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रण पत्रिका दाखवूनच आत सोडण्यात येत होते. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत. धनुषचे खरं नाव वेंकटेश प्रभू आहे.

कस्तूरी राजा यांच्या ‘आदुकलाम’ (2011) या सिनेमात धनुषने काम केलं होतं. या सिनेमातील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्याचे कौतुक केलं होतं. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

धनुष त्याच्या सिनेमामुळे चर्तेत होता. तर ऐश्वर्या फिल्म डायरेक्टर असल्यासोबत रजनीकांत यांची मुलगी असल्यामुळे देखील चर्चेत होती. दोघे चांगले मित्र होते मात्र दोघांच्यात काही तरी शिजत असल्याची सतत मीडियात चर्चा होती. या अफवांच्यामुळे दोन्ही कुटुंबातील लोक वैतागले होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धनुष 21 वर्षाचा होता व ऐश्वर्या 23 वर्षाची होती.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या – 

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती; एटीएममधून पैसे काढायचे असतील तर…

 “झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”

 IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली

किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा

‘माझ्या नादी लागाल तर करील 302’; पिंपरीतील तरुणीची सोशल मीडियावर भाईगिरी