“ठिणगी पडली, आता हा वणवा थेट दिल्लीत पोहोचणार”

औरंगाबाद | शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. संभाजीनगरचा मोर्चा ही तर सुरूवात असून वणवा थेट दिल्लीत पोहोचणार, असा इशारा संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

जनआक्रोशामुळे दिल्लीचे तख्तही हादरेल, असा इशाराही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे. शनिवारी वाढत्या महागाई विरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.

प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात हा मोर्चा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.’महागाई विरोधात शिवसेनेच्या या आक्रोशाची ठिणगी संभाजीनगरात पडली आहे. या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. मराठवाड्यानं महाराष्ट्राला लढण्याची प्रेरणा दिली आहे’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी शेकडो कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलं आहे.

हा इतिहास पाहता आम्ही मराठवाड्याची राजधानी संभाजीनगरातून आम्ही जनआक्रोशाची सुरूवात करत आहोत. ही तर सुरूवात आहे. या ठिणगीचा वणवा दिल्लीत पोहोचणार, असा सुचक इशारा संजय राऊत यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वाढत्या महागाईवरून जोरदार टीका आहे. गेल्या दोन वर्षात सुमारे 17 हजार लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आर्थिक संकट आणि महागाईच्या कारणामुळे आत्महत्या केली आहे. परंतु, केंद्र सरकारला याची काहीच चिंता नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:साठी तब्बल 18 कोटी रूपयांचे विमान खरेदी केले आहे. त्यामुळे अशा सरकारचं करायचं काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.

काही वर्षांपुर्वी 75 पैशांना असणारा साधा माचिस बॉक्स आता 2 रूपयांना झाला आहे, असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर काही कारस्थान करत असल्याचे आरोप केले आहेत.

राज्यात सत्तेत असूनही काही कामं करू द्यायची नाहीत, अशी कारस्थान रचली जात आहेत. दररोज महाविकास आघाडीच्या दारात ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सची यंत्रणा उभी करायची आणि सरकारची नाकेबंदी करायची, अशी कटकारस्थान रचण्यात येत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ही कारस्थान केवळ उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी आहेत, असाही आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. याद्वारे जनतेचं मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटविण्याचं काम सुरू आहे, त्याकरिता आम्ही आंदोलन करत आहोत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-  

…तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार – कंगना राणावत

अमरावतीत कलम 144 लागू; तीन दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय

अमरावती बंदचे हिंसक रुप: आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड

  ’50 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करायचे असतील तर…’; संजय राऊत यांनी सूचवला पर्याय

  “शिवसेनेनं कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही, ते आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत”