Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणी बोलताना आता उर्वशीनंही सांगितलं पडद्यामागचं सत्य म्हणाली…

नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ,त्यू  प्रकरणानंतर बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये रोज एका नव्या मुद्द्यावरून वा.द पाहायला मिळत आहे. सुशांतच्या मृ.त्यूनंतर बॉलीवूड मधील नेपो.टीजमच्या मुद्दा चांगलाच जोर धरून आहे. अनेक कलाकारांनी या मुद्द्यावरून आपली मतं व्यक्त केली आहेत. अशातच आता अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनेही नेपो.टीजमच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

उर्वशी रौतेला नेहमीच सामाजिक मुद्द्यावरून आपलं मत व्यक्त करत असते. याबाबत ती नेहमीच सोशल मीडियावरून बोलत असते. मात्र, उर्वशीनं आता इंडस्ट्रीत पडद्याआड चालणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

कोरोणामुळे 2020 मध्ये बॉलीवूडचं रूप पूर्णपणे बदललेलं आहे. मला आलिया एक अभिनेत्री म्हणून आवडते. मात्र IMDB वर माझ्या ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटाला जास्त रेटिंग देण्यात आलं होतं. या चित्रपटाला ‘सडक 2’ पेक्षा चांगलं रेटिंग दिलं गेलं होतं.

तसेच नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘खाली पिली’ या चित्रपटापेक्षा सुद्धा ‘व्हर्जिन भानुप्रिया’ बराच चांगला होता. मला माहित आहे की मीडियाची स्वतःची भूमिका आहे. मात्र, इंडस्ट्रीत बाहेरून आलेल्या लोकांना लहान मोठ्या गोष्टींसाठी टार्गेट केलं जातं. बाहेरून आलेल्या कलाकारांचा केवळ टीआरपी मिळवण्यासाठी उपयोग केला जातो, असं उर्वशीनं म्हटलं आहे.

उर्वशीनं पुढे इंडस्ट्रीत बाहेरून आलेल्या व्यक्तींना कसं टार्गेट केलं जातं याबद्दलही सांगितलं आहे. मी इंडस्ट्रीत नवीन असताना माझ्यावर अनेक खोटे आरोप करण्यात आले होते. मी ऋतिक रोशनशी रात्री दोन ते सकाळी चार वाजेपर्यंत फोनवर बोलत असते, अशी अफवाही माझ्याविषयी पसरवण्यात आली होती.

त्यावेळी मी नवीन असल्यानं मला माध्यमांना समजायला वेळ लागला. हे खोटे आरोप सेलिब्रिटींना हानी पोहोचवतात. मग ते स्टार किड्स असो किंवा बाहेरून आलेली व्यक्ती. मात्र, माझ्याविषयी ज्या प्रकारच्या अफवा माध्यमांनी पसरवल्या होत्या तशा अफवा फक्त इंडस्ट्रीत बाहेरून आलेल्या व्यक्तींविषयीच पसरवल्या जातात.  स्टार किड्स विषयी अशा अफवा पसरवल्या जात नाहीत, असंही उर्वशीनं म्हटलं आहे.

मी ऋतिक आणि त्याच्या कामाची चाहती आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मी त्याच्यावर प्रेम करते. या अफवेचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. असाच मानसिक त्रास सुशांत सिंह राजपूतला देखील झाला असावा, असंही उर्वशीनं म्हटलं आहे.

दरम्यान, उर्वशी ‘व्हर्जिन भानुप्रिया’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात गौतम गुलाटी आणि अर्चना पुरण सिंह यांनीही महत्वाची भूमिका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रेखा सध्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते? वाचा काय म्हणाली होती रेखा

चित्रपट सृष्टीवर पुन्हा पसरली शोककळा! आणखी एका बड्या दिग्दर्शकाचं नि.धन

आता कंगणा राणावत नव्या वादात; ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

रंगीन ख्रिस गेल… क्रिकेटसोबतच ‘या’ गोष्टीचाही लुटतोय मनमुराद आनंद!

बाप मजूर, आई चालवते दुकान; खेळायला मिळत नव्हता साधा बॉल, बनला याॅर्कर किंग!