कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकऱ्यांना आज पहाटे मुंबई, पुणे येथून अटक करण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश आहे.
अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. आज सकाळी अकरा वाजता तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
अंदुरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या बारा झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने याआधी संशयित शरद कळसकर याला अटक केली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला पुण्यातील तुरूंगातून बेड्या ठोकल्या आहेत. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, तिघांच्या अटकेनंतर पानसरे हत्याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या बारा झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी उपराजधानीत तीन हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात – https://t.co/F43Il4xSwR @narendramodi
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019
‘आप’ सरकारकडून कन्हैया कुमारला ‘क्लिन चिट’!- https://t.co/iGY1yhQE5C #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019
भारतासाठी आजची रात्र ऐतिहासिक ठरणार! – https://t.co/3ZmDMvY2ZU #Chandrayaan2theMoon
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 6, 2019